Dombivli News : जगातील कोणत्याही देवतांच्या आशिर्वादापेक्षा आई-वडिलांचा आशीर्वाद हा मुलांसाठी महत्त्वाचा असतो. मुलं लहान असताना आई-वडिलांसाठी ते विश्व असतात. त्या ऋणातून कोणतेही मुलं कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. पण, त्यांची वृद्धापकाळात सेवा करुन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मुलांना असते. पण, काही उलट्या काळजाची मुलं ते कर्तव्य विसरतात. डोंबिवलीमध्ये असाच एक संतापजनक प्रकार उघड झालाय.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीच्या मुलानं त्यांच्या 67 वर्षांच्या वयोवृद्ध मुलाला ट्रस्कटकडे सोपवले. पण तो त्यांना जेवण, पाणी काहीही देत नव्हता. ट्रस्टच्या लोकांनी संपर्क साधल्यानंतर हा मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. आता त्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
राकेश कुमार असं या मुलाचं नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतल्या गुप्ते रोडवर श्रीगंगोत्रीा सोसटीमध्ये राहतो. राकेशनं त्याच्या वडिलांना आश्रय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दाखल केले. पण, नंतर त्यानं पुन्हा वडिलांची विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन केला नाही.
( नक्की वाचा : Pune News : तिसऱ्या मजल्यावरच्या ग्रीलमध्ये अडकली चिमुकली, घरात कुणीही नाही! पाहा थरारक Video )
3 तारखेपासून ट्रस्टच्या लोकांनी राकेशला संपर्क करण्यास सुरुवात केली. पण, त्यानं त्यांना फोन उचलला नाही. राकेश वडिलांना जेवण, पाणी काही देत नव्हता. त्यामुळे प्रेमकुमार यांना शीव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचबरोबर पुन्हा शीव रुग्णालयातून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेमचंद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीतील पलावा पुल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद! काय झाला गोंधळ? )
आणि एक धक्कादायक बाब म्हणजे प्रेमचंद यांच्याकडून काही चेक घेऊन राकेश पसार असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकीकडे रुग्णलयात उपचार सुरु आहे. तर पोलिस निर्दयी मुलगा राकेश कुमार याला शोधत आहे. प्रेमचंद यांच्यावर उपचार झाल्यावर त्यांना कुठे ठेवायचे असा प्रश्न पोलिसांपुढे उभा आहे. त्यांचे घर आहे. सर्व आहे. मुलगा भेटत नाही. मुलगा राकेशच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस त्यांची प्रक्रिया राबवतीलच. त्याचवेळी वडिलांना सोडून जाणाऱ्या या निर्दयी मुलाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.