Dombivli : बोगस सातबारा, NA... 65 इमारतींमधील रहिवाशांचीच नाही तर बड्या सरकारी कार्यालयाचीही फसवणूक

Dombivli Unauthorized buildings issue :  कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

Dombivli Unauthorized buildings issue :  कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे.  या इमारतीमध्ये बोगस सातबारा, एनए, आणि जमीनीचे मोजणी नकाशे वापरले गेले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक झाली आहे.  या प्रकरणाशी संबंधित सर्व खोटे कागदपत्रे शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांत अधिकाऱ्याना देण्यात आले आहे. आत्ता या प्रकरणात बिल्डर आणि खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळी विरोधात लवकर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशी आदेश दिले आहेत. महापालिकेनंतर आणखी एक प्रशासकीय यंत्रणा या प्रकरणात गुन्हा दाखल करणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणात रहिवासीयांनी कसा दिलासा मिळणार यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे रहिवासीयांना फसविणाऱ्या बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणारी टोळीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 

गुरुवारी (27 फेब्रुवारी) बाधित रहिवासीयानी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पदाधिकारी आणि रहिवासीयांसाेबत प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पधिकारी आणि रहिवासीयांनी कशा प्रकारे या प्रकरणात प्रांत कार्यालयाची फसवणूक झाली आहे हे गुजर यांना दाखवून दिले. या इमारतीमध्ये खोटे सात बारा, एनए आणि जमीन माेजणीचे नकाशे तयार करुन जोडण्यात आले आहेत. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर प्रांत गुजर यांनी लगचेच या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश त्यांच्या विभागातील अधिकाऱ्याना दिले आहेत.

( नक्की वाचा : Dombivli : 65 इमारतींमधील नागरिकांची पुन्हा फसवणूक, बिल्डरांनी गोळा केले तब्बल दीड कोटी )
 

 या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रांत अधिकारी गुजर यांनी सांगितले आहे. त्यामुळे बिल्डर आणि कागदपत्रे तयार करणारी टोळी यांचे धाबे दणाणले आहेत.