Big News: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला होता. त्यानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या. संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यांच्या खोलीत सुसाईड नोट आढळली असून त्यामध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, अशी माहिती आहे. ठाकरे यांना मुलाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र अजूनही त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत. 
 

Advertisement

ठाकरे यांनी कुणावर केले आरोप?

डॉ. हेमलता ठाकरे यांची सुसाईड नोट NDTV मराठीला मिळाली आहे. त्याममध्ये त्यांनी लिहिलं आहे की, '' मला संसार करताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास ऑफिसमध्ये होत आहे. ऑफिसमधील अधिकारी मुद्दामहून मला त्रास देत आहे. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे माझी जगण्याची इच्छा संपली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा माल )
 

कुलगुरू विजय फुलारी आणि प्राध्यापक प्रशांत अमृतकर दोघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास देत आहे. आई मला सांगायची कितीही त्रास झाला तर सहन करायचं. तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ऑफिसचे साहित्य चोर म्हणून माझ्यावर पोलीस ठाण्यात केस केली. ते माझ्या मनाला खूप लागले आहे.

Advertisement

 आई... माझ्यावर घेतलेला हा आळ घेऊन पुढे घेऊन पुढे मी जगू शकणार नाही. ऑफिसमध्ये मी खूप प्रामाणिकपणे काम केलं मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जोडीदाराशिवाय मी एकटं जीवन जगत आहे, हे ऑफिसमधल्या लोकांना माहीत होतं. वरच्या अधिकाऱ्यांकडे मी या दोघांविरोधात तक्रारी केल्या होत्या. पण फुलारी यांचे पोलीस दलात मोठ्या पदावर नातेवाईक नोकरीला आहे. त्यांचे सगळ्या ऑफिसमध्ये आणि मंत्रालयात मित्र व नातेवाईक आहे. ते मला कधीच मदत करणार नाही. प्रशांत अमृतकरचे पण आहेत. त्यामुळे त्यांचे कुणीही काहीही करू शकत नाही.

माझ्या तक्रारीची दखल ना पोलिसांनी घेतली, ना विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यांनी घेतली. यापुढे मला ते खूप त्रास द्यायला सुरुवात करतील. मग आता जगून काय करू, यांना देव कधीच माफ करणार नाही. ते मला नोटीस यासाठी देतात की मी विद्यापीठ सोडावा किंवा जीव, अशी परिस्थिती निर्माण करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे,'' असं ठाकरे यांनी या चिठ्ठीमध्ये म्हंटलं आहे.