Naxalite : DRG जवानांची मोठी कारवाई, 1 कोटींच बक्षीस असलेल्या बसव राजूसह 26 नक्षलवादी ठार

डीआरजी जवानांनी मोठ्या नक्षलवादी नेत्यांना घेरलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

देशभरात नक्षलवादीविरोधी कारवायांनी जोर धरला आहे. गेल्या दोन महिन्यात कित्येक नक्षलवादी कारवाया करण्यात आल्या असून नक्षलवाद संपविण्यासाठी  खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बस्तरच्या अबुझमाडच्या जंगल परिसरात डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचं समोर आलं आहे.

अबुझमदमध्ये सर्वात मोठी चकमक झाली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी सरचिटणीस बसव राजूसह 26 हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. यामध्ये 1 जवान शहीद झाल्याचंही वृत्त आहे.  

नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा येथे नक्षलवादी आणि डीआरजी जवानांमध्ये चकमक सुरू होती. याशिवाय माड परिसरात सकाळपासून चकमक सुरू होती. डीआरजी जवानांनी मोठ्या नक्षलवादी नेत्यांना घेरलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

बिजापूर छत्तीसगडच्या अबुझमद येथे बुधवारी सकाळी पोलिस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाला. या चकमकीत सुरक्षा दलांना ऐतिहासिक यश मिळाले आहे. नक्षल आघाडीवर इतिहास घडवत, देशभरातील सुरक्षा दलाला हवा असलेला नक्षलवादी नेता डीआरजीच्या जवानांनी ठार मारला. आतापर्यंत 26 नक्षलवादी मारले गेले आहेत, ज्यात नक्षलवादी नेता आणि नक्षल समितीचे सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ ​​बाशव राजू यांचा समावेश आहे, ज्याच्या वर एक कोटीचे बक्षीस आहे. या चकमकीत इतर अनेक (सीसी) केंद्रीय समिती सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Advertisement

Topics mentioned in this article