गावात पसरली ड्रोनची दहशत,रात्रभर गस्त अन् मनात धास्ती

मिरजमधल्या जवळपास आठ ते दहा गावात रात्रीच्या वेळी हे ड्रोन घिरट्या मारतात. त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
सांगली:

मराठवाड्यातील काही गावांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याची नजर असल्याचे समोर आले होते. गावाची रेकी या ड्रोन मार्फत केली जात होती. हे कोण करत आहे हे काही समजत नव्हते. त्यामुळे गावांमध्ये दहशत पसरली होती. तसाच काही प्रकार सध्या मिरजमधल्या जवळपास आठ ते दहा गावात होत आहे. रात्रीच्या वेळी हे ड्रोन गावावर घिरट्या मारतात. त्यामुळे गावकरी चांगलेच दहशतीखाली आहेत. हे कोण आणि का करत आहे याचे उत्तर त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे गावकरी आता गावात रात्री गस्त घालत आहे. शिवाय पोलीसांनाही त्यांनी याबाबत कल्पना दिली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिरज पूर्व भागातील सुमारे आठ ते दहा गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या संशयामुळे सर्व गावांमध्ये शेकडो तरुण व ग्रामस्थ रस्त्यावर रात्रभर गस्त घालत आहेत. मिरज पूर्व भागातील टाकळी, बोलवाड, बेडग, आरग, मल्लेवाडी, एरंडोली, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी या भागात हे ड्रोन अचानक येत आहेत. घिरट्या घालून ते परत जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - एमआयएम मविआचं चाललंय काय? दानवे-जलील यांचे दावे प्रतिदावे

रात्री नऊच्या सुमारास हे ड्रोन गावात येतात आणि संपूर्ण गावभर घिरट्या घालतात. या मागे चोरीचा काही उद्देश आहे का? त्यासाठी रेकी केली जाते का? अशा एक ना अनेक शंका गावकऱ्यांनी उपस्थित केल्या आहेत. याबाबत गावकऱ्यांनी पोलीसामध्ये धाव घेतली आहे. शिवाय गावात होत असलेल्या या प्रकाराबाबत पोलीसांना सांगितले. पोलीसांकडेही याबाबत काही माहिती नव्हती. आता हे ड्रोन नक्की कुठून येत आहेत याची माहिती पोलीस काढत आहेत. तसा तपास त्यांनी सुरू केला आहे.