Video : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह, माजी नगरसेवकाच्या मुलाच्या कारची आणि टेम्पोची भीषण धडक

पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना झाली आहे

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

प्रतीक्षा पारखी

पुण्यातील पोर्शे कार (Pune Porshe Car Accident) प्रकरणानंतर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या धनदांडग्यांच्या पोराबाळांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात होता. पुण्यात अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतला तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळीमध्ये मिहीर शाह याने एका महिलेचा जीव घेतला होता.  पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन गाडी चालवत एका गाडीला धडक दिली आहे. या अपघातात सौरभसह मालवाहू गाडीचा चालक आणि त्याचा साथीदार जखमी झाले आहेत. पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात झाला आहे

हे ही वाचा - पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, दारु पिऊन वाहन चालवल्यास परवाना थेट रद्दच होणार

हा अपघात झाला तेव्हा सौरभ दारूच्या नशेत होता आणि तो राँग साईडने गाडी चालवत होता. या अपघातासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिपक बाबुराव हिवराळे यांनी ही तक्रार केली असून तेच कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवत होते. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की, ते कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवतात. 16 तारखेला पहाटे पाचच्या मुंढव्यावरून मांजरीकडे  जात होते. यावेळी समोरून एक गाडी येत होती. ही गाडी राँग साईडने येत होती. या गाडीने आपल्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे हिवराळे आणि त्यांच्यासोबत असलेला क्लिनर राजा शेख (29 वर्षे) हे दोघेही जखमी झाले. हिवराळे यांनी तक्रारीत म्हटलंय की समोरून येणाऱ्या गाडीचा नंबर MH12TH0505 होता आणि ही गाडी सौरभ गायकवाड होता. हिवराळे यांच्यावर मांजरीतील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Advertisement
Advertisement

मुंबईसाठी आदेश, पुण्याचे काय?

मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मुंबईसाठी हा आदेश देत असताना पुण्याचे काय असा प्रश्न मंगळवारच्या घटनेमुळे विचारला जाऊ लागला आहे. 

Advertisement

हे ही वाचा - IAS पूजा खेडकर यांचा 'कार'नामा

मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांना दिलेल्या आदेशात म्हटले होते की, रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत.  महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या

Topics mentioned in this article