कल्याण न्यायालयाने मशीद संघटनेचा दावा फेटाळला!

दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील निकालानंतर शिवसैनिकांकडून दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीची आरती करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेकडून दावा करण्यात आला होता. मात्र कल्याण दिवाणी न्यायालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील निकालानंतर शिवसैनिकांकडून दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीची आरती करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - कन्नडिगांची दडपशाही! महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी; मराठी नेत्यांची धरपकड अन् नजरकैद

मिळालेल्या माहितीनुसार, मुजलिसे मुशावरीन औकाफ ही मशीद संघटना असून या संघटनेच्यावतीने किल्ले दुर्गाडीची जागा त्यांच्या मालकीची आहे असा दावा कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा 1974 पासून प्रलंबित होता. या दाव्याच्या आधारे ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ले दुर्गाडी येथील सुरू असलेल्या सुशोभिकरणाच्या कामास हरकत घेण्यात आली होती. या दाव्या प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते.

Advertisement

मात्र आज या दाव्याची सुनावणी झाली. मशीद संघटनेने जागेवर केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सरकारी वकिल सचिन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ले दुर्गाडीची जागा वक्फ बोर्डाची आहे. त्या जागेचा ताबा त्यांना द्यावा. त्यांना धार्मिक कामासाठी त्याचा उपयोग करायचा आहे., अशी त्यांची मागणी होती. मात्र आता ही जागा सरकारने कल्याण पालिकेकडे वर्ग केली असून त्याचा उपयोग त्यांनी कसा करायचा हे त्यांनी ठरवावे लागेल. ही जागा मजलिसे मुशावरीन औकाफ यांच्या कायदेशीर मालकीची नाही. त्याचा त्यावर अधिकार नाही. त्यांनी दाखल केलेला प्रलंबित दावा मुदतबाह्य असल्याने हा दावा फेटाळण्यात आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'समाजवादी पक्ष भाजपची बी टीम वाटते', आदित्य ठाकरेंचा अबू आझमींवर पलटवार

या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं की, निकालाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली आहे, अशी माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितलं की, हा निकाल म्हणजे हिंदूचा विजय आहे. न्यायालयाने हिंदू धर्माला न्याय दिला आहे. सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दुर्गाडी किल्ला हिंदूचाच. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेने सुरू ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळालं. कल्याण येथील कोर्टाने दुर्गाडी किल्ला हिंदूचीच वहिवाट असल्याचा निर्णय दिला. मलंग गडाचाही निकाल लवकर लागावा असे ट्वीट उद्धव सेनेचे दीपेश म्हात्रे यांनी केले आहे.

Advertisement