जाहिरात

दुबईत थाटात लग्न उरकलं, पण घरी येताच ईडीने गुंडाळलं, Youtuber च्या घरात जे सापडलं वाचून व्हाल थक्क

ED Raids YouTuber Anurag Dwivedi : अनुराग नुकताच दुबईत झालेल्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. त्याने चक्क दुबईत क्रूझवर त्याचं लग्न केलं.

दुबईत थाटात लग्न उरकलं, पण घरी येताच ईडीने गुंडाळलं, Youtuber च्या घरात जे सापडलं वाचून व्हाल थक्क
एकेकाळी सायकलवर फिरणाऱ्या Youtuber च्या घरातून महागड्या कार ED नं जप्त केल्या आहेत.
मुंबई:

ED raids YouTuber Anurag Dwivedi's residences:  एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा प्रवास एका यूट्यूबरनं केला आहे.  अफाट संपत्ती, दुबईच्या समुद्रात क्रूझवर झालेला शाही विवाहसोहळा, बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी आणि दारात उभ्या असलेल्या लॅम्बोर्गिनी सारखी महागडी वाहनं, त्याला पूर्वीपासून ओळखणारा प्रत्येक जण हा प्रवास पाहून थक्क होत होता.  पण या झगमगाटाच्या मागे सट्टेबाजीचा काळा खेळ दडला असल्याचा संशय आता तपास यंत्रणांना आला आहे. कालपर्यंत जो व्यक्ती यशाच्या शिखरावर होता, त्याच्या दारात आता थेट ईडीचे अधिकारी येऊन धडकले आहेत.

काय आहे प्रकरण?

हा संपूर्ण प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात. नवाबगंज परिसरात राहणारा 25 वर्षांचा अनुराग द्विवेदी हा सोशल मीडियावर विशेषतः यूट्युबवर प्रचंड लोकप्रिय आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत गावात साध्या सायकलवरून फिरणारा हा तरुण अचानक कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक कसा झाला, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यूट्युबच्या माध्यमातून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

(नक्की वाचा : 18 वर्षे बुरख्यात ठेवलं,वडिलांना भेटू दिलं नाही; एका चुकीमुळे पत्नी अन् चिमुरड्यांची केली हत्या )

दुबईत शाही लग्न 

अनुराग नुकताच दुबईत झालेल्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. त्याने चक्क दुबईत क्रूझवर त्याचं लग्न केलं. इतकेच नाही तर उन्नावमधील नवाबगंज येथून आपल्या नातेवाईकांना त्याने स्वखर्चाने दुबईला नेले होते. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित असल्याचीही चर्चा आहे. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

दुबईतील तो शाही थाट उरकला आणि अनुराग मायदेशी परतला, मात्र त्याच्या मागोमाग अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले.

लॅम्बोर्गिनी आणि मर्सिडीज जप्त

ईडीने ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अनुरागच्या घरातून 4 महागडी वाहनं जप्त केली आहेत. यामध्ये एक लॅम्बोर्गिनी आणि एक मर्सिडीज यांसारख्या अतिशय महागड्या कारचा समावेश आहे. 

सट्टेबाजीच्या अवैध पैशातून या गाड्यांची खरेदी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय ईडीला आहे. ज्या ठिकाणी कधी सायकल उभी असायची, तिथे आज या लक्झरी कारवर ईडीने टाच आणली आहे.

Latest and Breaking News on NDTV

काय आहे सट्टेबाजीचे कनेक्शन?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अनुरागवर स्काय एक्सचेंज आणि इतर ऑनलाइन सट्टेबाजी ॲप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध पैसा कमवल्याचा आरोप आहे. हे ॲप्स भारतात बेकायदेशीर आहेत. 

अनुरागने त्याच्या यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या सट्टेबाजीच्या ॲप्सचे प्रमोशन केले. त्या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हा पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवून त्यातून मालमत्ता खरेदी करण्यात आली, असा ईडीचा दावा आहे.

Latest and Breaking News on NDTV

ईडीचा फास अधिक आवळणार

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही कारवाई केली आहे. या अवैध व्यवसायातून मिळवलेला पैसा वैध दाखवण्याचा प्रयत्न अनुरागकडून केला जात होता. सध्या ईडी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोण सामील आहेत, किती पैसा परदेशात पाठवण्यात आला आणि कोणत्या सेलिब्रिटींना किती पैसे मिळाले, याचा शोध आता घेतला जात आहे. येणाऱ्या काळात अनुरागच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com