एकनाथ खडसेंना धमकीचा फोन, 'त्या' डॉनचं नाव पुन्हा चर्चेत

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगच्या नावानं त्यांना हा फोन आल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
एकनाथ खडसे
मुंबई:

आनंद शर्मा

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगच्या नावानं त्यांना हा फोन आल्याची माहिती आहे. या प्रकरणात खडसे यांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन 15 आणि 16 एप्रिल रोजी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन करण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली. या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे, पोलीस पुढील तपास करतील, असं खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना सांगितलं. 

पुन्हा दाऊदचं नाव चर्चेत

यापूर्वीही एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानमधील घरामधून फोन आल्याचे आरोप करण्यात आले होते. दाऊदची पत्नी महजबी शेखच्या मोबाईल नंबरवरुन 2015 आणि 2016 च्या दरम्यान खडसेंच्या मोबाईल क्रमांकावर अनेकदा कॉल आले होते, असा आरोप आम आदमी पक्षाच्या तेव्हांच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला होता. त्यानंतर ATS नं या प्रकरणात तपास करत खडसेंना क्लीनचीट दिली होती. आता ताज्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा दाऊदचं नाव चर्चेत आलं आहे.  

खडसेंच्या अडचणी वाढणार? थेट राष्ट्रपतींनाच पत्र, प्रकरण काय?
 

एकनाथ खडसे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा एकदा भाजपामध्ये परतणार आहेत. त्यांनी स्वत:  याबाबतची घोषणा केली आहे. पण, अद्याप खडसे यांच्या भाजपाप्रवेशाची तारीख ठरलेली नाही. त्यांच्या सून रक्षा खडसे या सध्या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा भाजपानं तिकीट दिलं आहे.