Crime News :आंतरधर्मीय विवाह अन् आई-वडिलांचे तुकडे; भावनांचा तीव्र आक्रोश, अशी घटना जी वाचून अंगाचा थरकाप उडेल

इंजिनियर मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तो मुलगा इथवर थांबला नाही, त्याने आई-वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उत्तर प्रदेश के जौनपुर में इंजीनियर बेटे अम्बेश ने अपने मां-बाप की सिर पर वार कर हत्या कर दी थी.
  • हत्या के बाद शवों को आरी से छह टुकड़ों में काटकर सीमेंट के बोरे में भरकर नदी में फेंक दिया.
  • अम्बेश की शादी परिवार को मंजूर नहीं थी और पिता ने पत्नी से अलग होने के लिए 5 लाख रुपये देने से इनकार किया था.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये इंजिनियर मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तो मुलगा इथवर थांबला नाही, त्याने आई-वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. आणि हे तुकडे एका गोणीत भरून बेलाव पुलावरुन गोमती नदीत फेकून दिले. हत्या केल्यानंतर बहिणींना सांगितलं आई-बाबा रागावून कुठे तरी निघून गेले. गेल्या १३ डिसेंबरला बहीण वंदनाने जफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील दोन दिवसात १५ डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. 

या मुलाचं नाव अंबेश आहे. त्याचे वडील श्यामबहादूर (६२), पत्नी बबिता (६०) सोबत अहमदपूरजवळ नव घर बांधत होते. जून महिन्यात ते रेल्वेतून निवृत्त झाले होते. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगा आहे. अंबेशचं बीटेक पूर्ण झालं होतं. साधारण पाच वर्षांपूर्वी कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालविणाऱ्या एका मुस्लीम मुलीसोबत त्याने लग्न केलं होतं. या लग्नाला अंबेशच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे लग्नानंतर अंबेशची पत्नी सासरी येऊ शकत नव्हती. या लग्नावरुन घरात वारंवार वाद होत होता. 

पत्नीला सोडून दे, अंबेशवर आई-वडिलांचा दबाव...

लग्नानंतर अंबेशला दोन मुलं झाली होती. मात्र तरीही अंबेशच्या कुटुंबाने तिचा स्वीकार केला नाही. अंबेशचे वडील त्याला घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणत होते. शेवटी अंबेशनेही पत्नीला याबाबत सांगितलं. शेवटी तिनेही पोटगी देऊन नात्याचा शेवट करण्यास सहमती दिली होती.

५ लाखात पत्नीसोबत घटस्फोट, मात्र वडिलांनी...

आई-वडील वारंवार त्याला घटस्फोट घेण्यासाठी जबरदस्ती करीत होते. शेवटी त्याने नातं तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ५ लाख लागणार होते. ८ डिसेंबरला अंबेशने वडिलांकडे पैसे मागितले. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यादरम्यान वाद इतका टोकाला गेला की अंबेश आणि त्याच्या आईमध्ये मारहाण झाली. यादरम्यान रागाच्या भरात अंबेशने शेजारी ठेवलेल्या लोखंड्याच्या रॉडने आईच्या डोक्यावर वार केला. आई खाली कोसळली अन् तडफडू लागली. हे पाहताच अंबेशचे वडीलही घाबरले. त्यांनी कोणाला तरी कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगणार तोच अंबेशने वडिलांच्या डोक्यावरही कॉल केला. यानंतर तेही खाली कोसळले. काही वेळाने अंबेशचे आई-वडिल दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. 

Advertisement

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे केले तुकडे...

आई-वडिलांची हत्या केल्यानंतर अंबेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराखालील गॅरेजमधील रिकाम्या सिमेंटरच्या गोण्या घेतल्या. मात्र या गोण्या लहान होत्या. त्यामुळे त्याने करवतीने आई-वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. आधी डोकं वेगळं केलं, त्यानंतर कंबरेपर्यंतचा भाग, कंबरेपासून गुडघ्यापर्यंत भाग कापला. शेवटी गुडघ्यापासून पंजापर्यंत भाग वेगळा केला. हे सर्व तुकडे गोणीत भरले आणि गाडीच्या डिक्कीत ठेवले. सकाळी साधारण पहाटे पाच वाजता अंधारात कार घेऊन बेलाव पुलावरुन मृतदेह नदीत फेकला. यानंतर तो घरी निघून आला. 

बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांचा शोध सुरू...

बहिणींनी आई-वडिलांबद्दल विचारलं तर अंबेशनचे वेगळीच कहाणी सांगितली. आई-वडील रागाने निघून गेल्याचं त्याने सांगितलं. आता मी त्यांना शोधायला जात असल्याचं म्हणाला आणि गायब झाला. यानंतर बहिणींनी पोलिसात तक्रार केली आहे. यावेळी तिने तिघंजण बेपत्ता असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी शोध सुरू केला. १५ डिसेंबरला पोलिसांनी अंबेशला ताब्यात घेतलं. त्यावेळी तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं देत होता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घडलेला प्रकार सांगितला. 
 

Advertisement