ज्ञानोबा मारुती तिडोळे पाटील आणि त्यांची पत्नी चंचलाबाई ज्ञानोबा तिडोळे पाटील या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या मागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. पण त्याला सरकारने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. आरक्षणही मिळाले नाही. या नैराश्येतून या पती पत्नीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण मिळणार नसेल तर जगून तरी काय उपयोग असा सवाल या दोघांनीही केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळाले नाही. या नैराश्यातून लातूरच्या अहमदपूर येथील पती-पत्नीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. अहमदपूरच्या हसरणी येथील ज्ञानोबा मारुती तिडोळे पाटील त्यांच्या पत्नी चंचलाबाई न्यानोबा तिडोळे पाटील या दोघांनीही आरक्षण मिळाले नाही. या निराशातून विष प्राशन केले. या दोघांचीही तब्बेत गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी हे टोकाचं पाऊल आरक्षण मिळत नसल्यामुळे घेतले असल्याचे सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले
ज्ञानोबा हे गेली एक वर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. त्यांना आरक्षणाची आशा होती. पण मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. त्यामुळे आपल्या समाजाला आता आरक्षण भेटेल की नाही याची चिंता त्यांना होती. ज्ञानोबा तिडोळे पाटील यांना तीन मुले आहे. मुलगी यंदा अकरावीमध्ये शिकत आहे. तर मुलगा आठवीला आहे. दुसरा मुलगा सहावीला आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय व त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे.
ट्रेंडिंग बातमी - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव
मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर मुलांच्या भवितव्याची चिंता मिटली असती. शिक्षण नोकरीत त्यांना काही ना काही फायदा झाला असता. मुलगी आता अकरावीला आहे. पुढे तिला शिकायचे आहे. आरक्षण मिळाले असते तर तिला चांगल्या ठिकाणी प्रवेश घेता आला असता. पण आता आरक्षणच मिळणार नसेल तर आम्ही तरी जगून काय फायदा असा सवाल ज्ञानोबा यांनी उपस्थित केला. त्यांची पत्नीही रूग्णालयात त्यांच्या बाजूलाच होती. त्यांनी ही आरक्षण मिळत नाही म्हणून आपण हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले.