लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन तरूणीचं टोकाचं पाऊल, भयंकर घडलं

एका 17 वर्षाच्या तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर तरूणीनं टोकाचं पाऊल उचललं.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातही अशीच एक घटना घडली आहे. यात एका 17 वर्षाच्या तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर तरूणीनं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या मित्राला पोलीसांनी अटक केली आहे. ज्या परिसरात ही घटना झाली त्या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्ह्यात बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरात उजेडात आली आहे . आपल्या राहत्या घरी पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. 2 सप्टेंबरच्या रात्री पिडितेवर आरोपी शिवम दुपारे याने बल्लारपूर येथील एका OYO लॉज वर नेऊन बलात्कार केला होता. 

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक

या प्रकरणाला वाचा फुटल्यावर आरोपी मित्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शिवाय त्याला अटकही करण्यात आली. हा संपूर्ण घटनेनं ती तरूण हादरून गेली होती. बलात्काराच्या घटनेनंतर बदनामीच्या भितीने पीडितेने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या परिसरात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्या प्रकरणी ओयो हॉटेल मालकावर देखील कारवाई केली जाणार आहे.

Advertisement