परदेशातून एक फोन, पोलीस असल्याची बतावणी, थेट बदलापूर प्रकरणाशी संबंध जोडला अन्...

बदलापूर प्रकरणानंतर वातावरण चांगलेच तापले होते. लोकांमध्ये या विषयाची चर्चा आणि संताप आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र एक चक्रावून सोडणारी घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

बदलापुरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचारा झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. बदलापुरमध्ये तर संतप्त नागरीकांचा कडेलोट झाला. रेल्वे ठप्प झाली. काही ठिकाणी हिंसाचारही झाला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेने केले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. लोकांमध्ये या विषयाची चर्चा आणि संताप आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र एक चक्रावून सोडणारी घटना घडली आहे. एक फोन कॉल आला. तो ही परदेशातून. पलिकडून बोलणारी व्यक्ती आपण पोलीस असल्याचे सांगत होता. शिवाय तुमच्या मुलाचे नाव बदलापूर रेप प्रकरणात आहे. असं थेट सांगितलं. त्यामुळे ज्या वक्तीला फोन केला होता त्यांच्या पाया खालची वाळूनच सरकली.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक महिला दादर इथे राहातात. बुधवारी दुपारी त्या आपल्या दुकानात होत्या. त्याच वेळी त्यांच्या फोनवर  +923403154944  या क्रमांकावरून फोन आला. या फोनचा फोन कोड हा पाकिस्तानचा होता. मात्र त्या महिलेला सुरूवातीला हे लक्षात आले नाही. त्यांनी फोन उचलला. फोन उचलल्यानंतर मी पोलीस बोलत आहे. बदलापूर रेप प्रकरणात आम्ही काही मुलांना ताब्यात घेत आहोत. त्यात तुमच्या मुलाचंही नाव आहे. तुम्हाला किती मुले आहेत. ते किती वर्षाचे आहेत. महिलेला हे सांगितल्यानंतर त्या घाबरून गेल्या. सुरूवातीला काय करावं हे त्यांना समजलं नाही. 

ट्रेंडिंग बातमी -  Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक 

त्यांनाही दोन मुलं आहे. एक दहावीला आहे तर एक पहिलीला आहे. त्यामुळे त्या जास्त घाबरल्या. पण त्यांना थोडा संशय आला. त्यांनी लगेच स्वत:ला सांभाळत त्याच व्यक्तीची उलट तपासणी घ्यायला सुरूवात केली. शिवाय त्याला दोन कडक असे शब्दही सुनावले.  हिंम्मत असेल तर आता आमच्या घरी या अशा शब्दात त्याची कान उघाडणी केली. सदर महिला अधिक आक्रमक होत आहे. आपला डाव फसला आहे हे खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीच्याही लक्षात आले. त्यांने लगेच फोन कट केला. विशेष म्हणजे त्याने द्या फोन वरून कॉल केला होता त्याली डिपी हा पोलीसांचा होता. त्यामुळे ही महिला सुरूवातीला  घाबरली. 

ट्रेंडिंग बातमी - अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...

पण ती व्यक्ती हिंदीत संभाषण करत होती. त्यामुळे तिला संशय आला. पुढे तिने त्याला जशाच तसे उत्तर दिले. त्यामुळे त्याचा डाव त्यांनी उधळवून लावला. असे फोन कॉल करून पालकांना घाबरवलं जातं. शिवाय त्यांच्याकडून पैसेही उकळले जातात. अशा घटना या आधीही घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहाणे गरजेचे आहे असे संबधीत महिलेने सांगितले. त्यांनीही घाबरून जण समोरचा व्यक्ती जे सांगत आहे हे ऐकले असले तर त्यांना ते खूप महागात पडले असते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'भाजपच्या मतांशिवाय मित्रपक्षाचे उमेदवार निवडून येणार नाहीत' राणेंनी थेट सुनावले

बदलापुरमध्ये एका नामांकीत शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आले होते. शिवाय याबाबतची तक्रार घेण्यासही पोलीसांनी उशिर केला असा आरोप होत आहे. शाळेनेही हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आता आरोप होत आहे. या विरोधात बदलापुरमध्ये जनतेमध्ये उद्रेक झाला होता. रेल्वे सेवा रोखण्यात आली होती. काही ठिकाणी दगडफेकही झाली. शाळेवरही लोकांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे बदलापुरचे वातावरण तापले होते. सध्या बदलापुरात तणाव पूर्ण  शांतता आहे. 

Advertisement