जाहिरात
This Article is From Aug 21, 2024

अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...

बदलापुरातील घटना ताजी असताना अकोल्यातील ZP शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...
अकोला:

बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड इथे जिल्हा परिषद शिक्षकांने सहा मुलींचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक हा आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. पीडित विद्यार्थिनींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हा संपूर्ण घटना उघडकीस आली. पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील एका शाळेत सहा विद्यार्थिनींचा शिक्षकांने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रमोद सरदारला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत असल्याचं उघड झालंय. एक दोन नाही तर गेल्या चार महिन्यांपासून हा शिक्षक मुलींचा छळ करत होता.

नक्की वाचा - Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक

पीडित विद्यार्थिंनींनी हा सगळा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलींच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत शिक्षकाची तक्रार केली. अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर हे सगळे प्रकार आता राज्यभरातून उघडकीस येऊ लागलेत. ज्या शाळेत विद्यार्थिनी शिकायला जातात, त्याच शाळेत जर त्या सुरक्षित नसतील तर त्यांनी काय करायचं असा सवाल आता उपस्थित होत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: