Fake Currency Racket: संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त! एका सिगरेटमुळे काळा धंदा उघडकीस

Chhatrapati Sambhajinagar Fake Currency Printing House: आरोपींनी वाळूज एमआयडीसीतील साजापूर-क्रांतीनगर येथे एक बंगला भाडेतत्त्वावर घेऊन बनावट नोटा छापण्याचा कारखाना टाकला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar Fake Currency Racket: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील बनावट नोटांचा नोटांचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. 500 रुपयांच्या 59. 20 लाखांच्या बनावट नोटा, 27.90  लाखांची मशिनरी, शाई, कागद व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी 7 जणांना अटक केली. नोटांच्या छपाईसाठी भोपाळहून शाई व कागद खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावर दोघे आलिशान मोटारीत फिरत असून, त्यांच्याकडे पाचशेच्या बनावट नोटा आहेत. त्यांनी आंबिलवाडी शिवारात पानटपरीत पाचशे रुपये देऊन सिगारेटचे पाकीट घेतले आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी निखिल गांगर्डे, सोमनाथ शिंदे यांना पकडले होते, त्यांच्याकडन 80 हजारांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सर्व भांडाफोड झाला. त्यामुळे आरोपींना 500 च्या नोटा देऊन सिगारेट घेणं महागात पडले.

Pune Crime: पुण्यात वर्दीही असुरक्षित? गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण; गाडी अडवल्याचा राग अन्...

असा झाला पर्दाफाश!

पोलिसांनी निखिल शिवाजी गांगर्डे, सोमनाथ माणिक शिंदे यांना  ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीत या नोटा बीडमधील व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदीप संजय कापरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपासानंतर छत्रपती संभाजीनगर येथून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाळूजमध्ये पोलिसांनी छापा मारला. यावेळी मंगेश पंढरी शिरसाठ ,विनोद दामोधर अरबट ,आकाश प्रकाश बनसोडे ,कअनिल सुधाकर पवार यांना ताब्यात घेण्यात आले. पण मुख्य आरोपी अंबादास रामभाऊ ससाणे फरार झाला असून ,तो अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. 

तपासात धक्कादायक खुलासा!

दरम्यान, गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपींकडून खळबळजनक गोष्टी पुढे आल्या. त्यांच्याकडून शेवगाव, बीड व पुण्याचे कनेक्शनही समोर आले आहे. इतर आरोपींची नावे निष्पन्न होताच पोलिसांनी बीड जिल्हयातून प्रदीप कापरे, संभाजीनगरमधून मंगेश शिरसाठ, विनोद अरबट, आकाश बनसोडे, अनिल पवार यांना अटक केली. आरोपींनी वाळूज एमआयडीसीतील साजापूर-क्रांतीनगर येथे एक बंगला भाडेतत्त्वावर घेऊन बनावट नोटा छापण्याचा कारखाना टाकला होता. तिथे नोटा प्रिंटिंग मशीन, कटिंग मशीन, हॅलोजन असे साहित्य मिळून आले. ही टोळी प्रत्येक वेळी जागा बदलून हा गोरखधंदा करते. ज्या ठिकाणी नागरिकांचे फारसे लक्ष नसेल, अशी जागा निवडतात, असे तपासात निष्पन्न झाले.

Advertisement

पतीचा विकृत कारनामा! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले, ब्लॅकमेल करत डान्सबारमध्ये नाचवले, पुढे...