
वैभव घुगे
Nashik News: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकच्या हिरावाडी येथे घडली आहे. पतीने पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळही केली. त्यानंतर त्याने कहर केला. तिला जबरदस्तीने डान्सबार मध्ये नाचण्यास भाग पाडले. असे गंभीर आरोप पत्नीने केले आहेत. पीडितीच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नीचे नाते म्हणजे प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतदारपणावर आधारीत एक पवित्र बंधन आहे. हे नाते केवळ सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्याच नाही, तर भावनिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे. एक धागा दुसऱ्याला जोडला जातो. पती-पत्नीचे नाते तयार होते. वधू आणि वर अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतात. सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिले जाते. अनेक पती-पत्नीच्या नात्यात अडचणी येतात. भांडणही होतात. मात्र या सर्व गोष्टीं पलीकडे जाऊन नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
नक्की वाचा - Nashik News: विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहीरीत घेतली उडी, भयंकर कारण आलं समोर
पतीने निर्लज्जपणाची सीमा गाठत चक्क पत्नीला डान्सबारमध्ये नाचवले आहे. पतीने पत्नीला गुंगीचे औषध देत तिचे अश्लील व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप पत्नीने केला आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Nashik Crime : 75 गुन्ह्यातील चेन स्नॅचरवर धाडसी नणंद-भावजयीची झडप, मंगळसूत्र चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पती पवन राजेंद्र वाडेकर, त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.ऑगस्ट 2022 ते 21 जुलै 2025 या कालावधीत तिचा पती पवन राजेंद्र वाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे यांनी संगनमताने गुंगीकारक औषध देऊन तिला मानसिक व शारीरिक पद्धतीने गुलाम बनविले. या काळात तिला बेंगळूर व सोलापूर येथे नेले. तिचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली आणि डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले. छळ असह्य झाल्याने तिने पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world