Crime news: बँकेच्या वसूली एजंटचा धुमाकूळ, हफ्ता भरला नाही म्हणून शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला

किसन बोरसे यांच्या आईने देवळ्याच्या आय.डी.एफ.सी.फायनान्स बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

कर्जाचा एक जरी हाफ्ता चुकला तरी बँकेचे वसूली एजंट धुमाकूळ घातलात. त्यांचा हा धुमाकूळ काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. एका मागून एक अशा घटना घडतच चालल्या आहे. या वसूली एजंटचा धसका कर्जदारांनी घेतला आहे. त्यांची दहशत त्यांच्या मनात बसली आहे. कधी घरी येतील आणि काय करतील याचा या वसूली एजंटचा नेम नाही. मारहाण करणे, धमकावणे हे त्यांचे नित्याचेच झाले आहेत. त्यांना कसलाही धाक राहीला नाही. म्हणूनच एका शेतकऱ्यावर बँकेचा हफ्ता भरला नाही म्हणून थेट तलवारीने वार करण्याचे त्यांचे धाडस झाले आहे.  ही घटना नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून बँकेच्या वसुली एजंटनी शेतमजुरावर तलवारीने प्राण घातक हल्ला केला आहे. ही  धक्कादायक घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील निवाने गावात घडली आहे. या हल्ल्यात किसन नामदेव बोरसे हा शेतमजूर जखमी झाला आहे. त्याला तातडीने कळवण उपजिल्हा रुगणालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - EVM हॅक करून दाखवा, माझी प्रॉपर्टी घेऊन जा! भाजप नेत्याचे चॅलेंज कोण स्वीकारणार ?

किसन बोरसे यांच्या आईने देवळ्याच्या आय.डी.एफ.सी.फायनान्स बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी कर्जाचे हफ्ते नियमित भरले होते. मात्र एक हफ्ता भरला गेला नाही. काही कारणानं तो राहून गेला. हीच संधी साधत बँकेचे वसूली एजंट बोरसे यांच्या घरी धडकले. तिन वसुली एजंट त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी बोरसे  हे घरी होते. त्यांनी आधीच हाफ्ते आपण भरले आहे. एक हफ्ता काही कारणाने राहीला आहे असं एजंटना सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - Delhi Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?

मात्र वसूलीसाठी गेलेल्या त्या एजंटनी त्यांचे काही एक ऐकले नाही. तिघांनी बोरसे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर लाथा बुक्क्याने मारहाण ही केली. त्यावरच त्यांचे भागले नाही. त्यांनी तलवार काढत किसन बोरसे याच्या डोक्यात तसेंच पाठीवर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे नशिब चांगले असल्याने ते या हल्लात जबर जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement