भाजपचे माजी मंत्री आणि विद्यामन आमदार डॉ. संजय कुटे यांच्या घरामध्ये संतप्त शेतकरा घुसला. त्यांनी त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न ही केला. अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. यात त्यांनी आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काल मध्यरात्री आमदार संजय कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर होते. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला. त्याच्या हातात पेट्रोलचे कॅन होते.
मला अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो असं म्हणत, त्याने पेट्रोलचे कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेश द्वारकडे धावला. त्याच वेळी कुटे यांच्या स्विय सहायक यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची पुर्तता अजूनही झाली नाही. त्यामुळे ही शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आता पेरणी करायची आहे. त्यात बँका कर्ज देत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे ही शेतकरी हैराण झाला आहे.