Karnataka Crime : कर्नाटकच्या कलबुर्गी तालुक्यातून ऑनर किलिंगचं हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे वडील आणि नातेवाईकांनी आपल्या 18 वर्षांच्या मुलीची हत्या केली. या मुलीचं दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होतं. स्थानिकांनी सुरुवातीला सांगितलं की, मुलीने विष खालंल, मात्र पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आलं.
कुटुंबीयांचा मुलीच्या नात्याला विरोध
नुकतच कविताने कलबुर्गीच्या धर्मसिंह कॉलेजमधील पीयूसीमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. तिचं कुरुबा समाजातील एक रिक्षा चालक मलप्पाच्या प्रेमात होती. मात्र तिच्या कुटुंबाकडून याला विरोध होता. कुटुंबीयांनी वारंवार तिला मलप्पापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मात्र तरीही कविताला मल्लपासोबत लग्न करायचं होतं, आणि कुटुंबीयांनी परवानगी न दिल्यास तिने पळून जाण्याची धमकी दिली होती.
हत्या करून आत्महत्येचा रचला बनाव
27 ऑगस्टच्या रात्री या मुद्द्यावरुन पुन्हा एका कविता आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाला. तिचे वडील शंकर कोल्लूर, त्यांचा भाचा शरणु आणि नातेवाईक दत्तप्पा चोलाबारद यांनी घराच्या आत गळा आवळून तिची हत्या केली. आत्महत्येचा बनाव रचून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी त्यांनी कविताच्या तोंडात कीटनाशक औषध टाकलं.
नक्की वाचा - Konkan Crime News : गणेशोत्सवादरम्यान कोकण हादरलं! आंबा घाटात तरुणीच्या मृतदेहाने परिसरात खळबळ
पोलिसांच्या तपासात सत्य आलं समोर
दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी पुरावा मिटविण्यासाठी कविताचा मृतदेह चिक्का रोडजवळील शंकराच्या भावाच्या शेतात जाऊन जाळला. गावकऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की, मुलीने विषारी औषधं खाल्लं, त्यातून तिचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय आल्याने त्यांची याचा तपास सुरू केला. त्यांना घटनास्थळावरुन अंशिक स्वरुपात जळालेले अवशेष सापडले आणि कटकारस्थान उघडं पडलं. यानंतर पोलिसांनी फरहताबाद स्टेशनमध्ये या बाबत गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणात वडील शंकर कोल्लूर यांना अटक करण्यात आली आहे. तर शरणू आणि दत्तपाचा तपास सुरू आहे. कविता पाच मुलींमध्ये चौथ्या क्रमांकावर होती. दोन मोठ्या बहिणींचं लग्न झालं आहे. सर्वात लहान बहीण नववीच्या वर्गात आहे.