Dombivli Rape Case : डोंबिवलीत नराधम बापाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. आरोपी बापाने दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकाराबाबत काही नागरिकांना समजलं. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आणि कारपेंटरचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली.त्यानंतर पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
एक वर्षापूर्वी 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बापाने एक वर्षापूर्वी त्याच्या 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. आरोपीला चार मुली आहेत. त्याने इतरही दोन मुलींसोबत संतापजनक कृत्य केलं आहे का? याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नक्की वाचा >> Nida Khan: 42 दिवसांपासून गुंगारा देणारी निदा खान कशी सापडली? AIMIM चा 'तो' नेता कसा अडकला? वाचा आतली खबर
पत्नीनं पतीला का थांबवलं नाही?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या मुलींची आई काय करत होती? या संदर्भात तिची काय भूमिका आहे? तिने तिच्या पतीला का थांबवलं नाही? याप्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.