मोसीन शेख, प्रतिनिधी
Nida Khan Arrest Inside Story : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची मास्टरमाईंड निदा खान गेल्या 42 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र,छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक गुन्हे शाखेने रचलेल्या एका चपखल जाळ्यात ती अखेर अडकली. विशेष म्हणजे,तिला मदत करणारा एमआयएमचा माजी नगरसेवक मतीन पटेल याच्याच माध्यमातून पोलिसांनी हा ऑपरेशन यशस्वी केला.मतीन पटेलला वाटलेही नव्हते की ज्या पोलिसांकडून तो संरक्षण घेतोय,तेच त्याला निदापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बनवतील.
निदा खान ही संभाजीनगरातील नारेगाव भागात लपली असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती.मात्र, मतीन पटेल सारखा राजकीय वरदहस्त तिला पाठीशी घालत असल्याने थेट कारवाईत अडथळे येऊ शकत होते.हे ओळखून पोलिसांनी 'गोड बोलून'सापळा रचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात तुझे स्टेटमेंट नोंदवायचे आहे,असे सांगून पोलिसांनी मतीन पटेलला बोलावून घेतले.जुन्या प्रकरणाचे निमित्त पुढे केल्याने मतीनचा संशय मावळला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात स्वतःहून चालत आला.
नक्की वाचा >> Shirdi News: 'या' विद्यार्थ्याच्या SSC निकालाची महाराष्ट्रभर चर्चा, 6 विषयातील मार्क्स पाहून टॉपरही झाले थक्क
मतीनने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला,पण..
सुरुवातीला पोलिसांनी मतीन पटेलचे जुन्या घटनेबद्दल रीतसर स्टेटमेंट घेतले. वातावरण निवळलेले पाहून पोलिसांनी आपला मुख्य मोर्चा निदा खानकडे वळवला.निदा कुठे आहे?या प्रश्नावर सुरुवातीला मतीनने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र,पोलिसांच्या तपासाचा रोख आणि खाक्या पाहून त्याचा आत्मविश्वास डगमगला.अखेर,निदा खान ही तिचे आई-वडील,मावशी आणि भाऊ कौसर पार्क परिसरात लपून बसले असल्याची कबुली त्याने दिली आणि पोलिसांचा 42 दिवसांचा शोध संपला.
माहिती मिळताच नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरीत्या कौसर पार्क आणि नारेगाव परिसरात छापेमारी केली.ज्या निदा खानने सलग दीड महिना पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.तिला पळून जाण्याची एकही संधी न देता पोलिसांनी झडप घातली.धर्मांतर आणि अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली फरार असलेली निदा आता कोठडीत असून तिला मदत करणाऱ्या इतर राजकीय धाग्यादोऱ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीतील 'त्या' इमारतीत सुरु होता सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला अन्..
निदाचा मावशीवर संशय अन्...
निदा खान सापडत नसल्याने पथक तिचं ठीक ठिकाणी शोध घेत होते.याचवेळी निदा खानच्या जवळच्या लोकांवर आणि नातेवाईकांवर तांत्रिकदृष्ट्या पोलिसांचं लक्ष होतं.दरम्यान,याच तपासात निदा खान आणि तिचे आई-वडील निदाच्या मावशीच्या संपर्कात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.पोलिसांनी निदाच्या मावशीला ट्रॅक करायला सुरुवात केली.याचवेळी निदाची मावशी छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव प्रभागचे नगरसेवक एमआयएमचे मतीन पटेलच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिसांसाठी मतीनला ताब्यात घेणं महत्त्वाचं होतं.त्यानुसार पोलिसांनी प्लॅन रचत मतीनला ताब्यात घेतलं आणि खात्या दाखवतात मतीन सगळं काही सांगून टाकले.मतीने निदाचं ठावठिकाण सांगताच नाशिकच्या विशेष पथकाने आणि संभाजीनगरच्या गुन्हे शाखा पथकाने छापा मारून तिला ताब्यात घेतलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world