Navi Mumbai : नवी मुंबई घणसोली बस डेपोमध्ये आगीचा भडका; 4 इलेक्ट्रिक बससह दोन डिझेल बस जळून खाक

या घटनेमुळे घनसोली आगारातील सुरक्षाव्यवस्था, शॉर्टसर्किटविरोधी उपाययोजना, चार्जिंग स्टेशनच्या देखभालीची पद्धत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

नवी मुंबईतील घणसोली एमआयडीसी परिसरात असलेल्या बस डेपोमध्ये आज (4 जून) सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीत चार इलेक्ट्रिक आणि दोन डिझेल बस जळून खाक झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चार महिन्यांत दुसरी आग

विशेष म्हणजे याच बस डेपोमध्ये चार महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची आग लागली होती. त्यामुळे डेपोतील सुरक्षाव्यवस्था आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या ठिकाणी सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन अगदी जवळच असून, सुदैवाने यांना आग लागलेली नाही, अन्यथा मोठा स्फोट होण्याची शक्यता होती.

नक्की वाचा - Road Accident : झोपेत घात झाला, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 15 ते 20 जखमी 

Advertisement

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस्सना लागली आग

प्राथमिक माहितीनुसार, सर्व बस पार्किंगमध्ये उभ्या असतानाच आगीचा भडका उडाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी

नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, बस डेपो व्यवस्थापनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

Advertisement

जळालेल्या बसना डेपोबाहेर काढण्याचे काम सुरू

जळून खाक झालेल्या बसना जेसीबीच्या सहाय्याने डेपोबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आगीमुळे इतर बसेस आणि पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे घनसोली आगारातील सुरक्षाव्यवस्था, शॉर्टसर्किटविरोधी उपाययोजना, चार्जिंग स्टेशनच्या देखभालीची पद्धत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिवहन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजनामुळे सातत्याने अशा दुर्घटना घडत असल्याची नागरिकांकडून तक्रार व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article