राहुल कांबळे, नवी मुंबई
परदेशी जहाजांवरील डिझेलची चोरी करून त्याची विक्री करणारे रॅकेट रायगड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. तस्करी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे डिझेल व एक बोट जप्त करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समुद्रमार्गे डिझेलची अवैध तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा रायगड येथून जेरबंद करण्यात आली आहे. गणेश कोळी, विनायक कोळी, गजानन कोळी, मुकेश निषाद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
(नक्की वाचा-पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)
काही दिवसापासून समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रेवस जेट्टी येथील समुद्रकिनारी एक बोट समुद्रमार्गे डिझेल घेऊन येणार आहे. त्यावरुन पोलीस पथकाने परिसरात पाळत ठेवली.
(नक्की वाचा - Microsoft सर्व्हर डाऊन : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन का झाले? मोठं कारण आलं समोर)
मिळालेल्या माहितीनुसार एक संशयीत बोट किनाऱ्यालगत येऊन थांबली. पोलिसांनी बोटीजवळ जाऊन पाहाणी केली असता सदर बोटीमध्ये 4 जण सापडले. त्यांचाकडे सदर बोटीमध्ये असलेल्या मालाबाबत चौकशी केली त्यावेळी त्यांनी डिझेल असल्याचे सांगितले. समुद्रमार्गे अवैद्यरित्या 33 हजार लिटर डिझेल आणल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी एकूण 36 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ा आहे.