दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वाडा तालुक्यातील खैराव येथे चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहे. प्राथमिक माहितीनुसार नदीपात्रात बुडालेले ऊसतोड कामगार हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड कामगारांच्या टोळी सोबत आलेले हे कामगार नदीवर अंघोळीसाठी गेले होते. त्यांच्या बरोबर इतर कामगारही होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे कामगार बुडाले असल्याची माहिती आहे. या कामगारांना नदीपात्रातत शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. शंकर विनोदी शिवणकर, प्रकाश धाबेकर ,अजय मंगाम, राजीव गेडाम असे बुडालेल्या चार ऊसतोड कामगारांची नावे आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांबाबत ही घटना घडल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
ऊसतोडीचा हंगाम आता सुरू होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातून हे ऊसतोड कामगार येत असतात. त्यामुळे यवतमाळवरूनही हे कामगार सोलापूर जिल्ह्यात आले होते. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने हे सर्व जण अंघोळ करण्यासाठी नदीवर गेले होते. नदीला पाणही जास्त होते. वाहत्या पाण्याचा या कामगारांना काहीच अंदाज आला नाही. त्यात एका पाठोपाठ एक असे चार जण वाहत्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांना शोधले जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - प्रकाश आंबेडकरांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट, सुजात आंबेडकरांनी काय आवाहन केलं?
चार कामगार वाहून गेले आहेत हे समजल्यानंतर नदी काठी अन्य कामगारांनी गर्दी केली होती. शिवाय बचाव पथकही घटनास्थळी दाखल झालं होते. शिवाय स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा प्रसंग घडल्याने वाहून गेलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.