Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, 5 जण ताब्यात

विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून या पाचही माओवाद्यांवर एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व एसआरपीएफने ताब्यात घेतलं आहे. एक डिव्हीसीएम, एक एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह तीन प्लाटून सदस्य पदावरील जहाल माओवाद्यांना अबुझमाडचे बिनागुंडा परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यातील तीन माओवाद्यांना अटक आणि इतक दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे. या माओवाद्यांकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक 303 रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार असे एकूण 07 हत्यार (अग्निशस्त्रे) जप्त करण्यात आलं आहे. या माओवाद्यांकडून घातपाताचा मोठा डाव होता. मात्र गडचिरोली पोलिसांनी तो उधळून लावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने पाचही माओेवाद्यांवर एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. 
 
गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशा अनेक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या पाच माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ यांनी ताब्यात घेतलं आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 103 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Chalisgaon Crime : पोलिसाकडून 1.20 लाखांची खंडणी, आमदाराची तक्रार; चाळीसगावात पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

घातपाताचा डाव उधळला...

गडचिरोलीतील भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी अंतर्गत मौजा बिनागुंडा येथे 50 ते 60 माओवादी पोलीस जवानांवर हल्ला करुन घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र जमणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सि-60 (विशेष कृती दल) ची 08 पथके आणि ए कंपनी 37 बटा. सिआरपीएफच्या पथकाला रविवार 18 मेला जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते. दरम्यान 19 मे रोजी सकाळी बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करण्यात आली. यावेळी साध्या वेशातील हत्यारासह असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरुन पळून जाण्यास यशस्वी झाले. 

Advertisement

1)    महाराष्ट्र शासनाने उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटून क्र. 32) हिच्यावर 16 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
2)    महाराष्ट्र शासनाने पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटून क्र. 32) हिच्यावर 08 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
3)    महाराष्ट्र शासनाने देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटून क्र. 32) हिच्यावर 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
4)    इतर दोन माओवादी सदस्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे एकूण 08 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.