लेडी डॉन म्हणून ओळख असलेली अनुराधा चौधरी ही आता आई होणार आहे. तिचा पती दिल्ली आणि अनेक राज्यांमध्ये खंडणीच्या प्रकरणात गँगस्टर काला जठेडी सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. आपल्याला मुलाल जन्म द्यायचा आहे. त्यासाठी पॅरोल मिळावे यासाठी त्याने याचिका केली होती. पण त्यासा पॅरोल देण्यास नकार दिला होता. परंतु, जठेडीच्या वकिलाच्या एका युक्तिवादावर न्यायाधीशही त्याला पॅरोल देण्यास सहमत झाले. त्यांनी गँगस्टर जठेडीला तुरुंगातच आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेस परवानगी दिली आहे. त्यामुळे लेडी डॉन असलेल्या अनुराधाचा आई होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक न्यायालयाने सुनावणीदरम्यान आपल्या आदेशात गँगस्टर काला जठेडीला जेलमध्ये असतानाच मूल जन्माला घालण्यासाठी आयव्हीएफला मंजुरी दिली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक वासन यांनी सुनावणी करताना हा आदेश दिला होता. मात्र, याच आदेशात काला जठेडीचे वकील रोहित कुमार दलाल यांच्या एका अर्जाला उत्तर देताना असे सांगितले की, तुरुंगात वैद्यकीय प्रक्रिया करण्यास परवानगी दिली जाते. त्यानुसार त्याला आता विशेष परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार त्याचे नमून घेतले गेले.
या आदेशात म्हटले आहे की, डॉक्टर 14 जून रोजी सकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान तिहार तुरुंगात जठेडीकडून आवश्यक नमुने गोळा करतील. गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना, जिथे जठेडीची पत्नी आयव्हीएफ उपचार घेत आहे तिथल्या डॉक्टरांना जठेडीचे नमुने गोळा करण्यासाठी तिहारला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जठेडीचे नमून ही घेतल्याची माहिती आहे. ही सर्व प्रक्रीया अतिशय गोपनिय ठेवण्यात आली होती. आयव्हीएफची वेळेनुसार संवेदनशील असल्याने तात्पुरता पॅरोल आवश्यक आहे असा युक्तीवाद जठेडीच्या वकीलांनी केला होता. पण त्या ऐवजी जेलमध्येच ती सोय करण्यात आली.
अनुराधा चौधरी आणि काला जेठेडी यांचs 12 मार्च 2024 रोजी लग्न झाले होते. जठेडीची पत्नी अनुराधा चौधरी, हिला'मॅडम मिंझ' नावानेही ओळखले जाते. तीच्यावर सध्या आई होण्यासाठीचे उपचार सुरू आहेत. गँगस्टर काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी यांचे लग्न 12 मार्च 2024 रोजी द्वारका बँक्वेट हॉलमध्ये कडेकोट बंदोबस्तात झाले होते. लग्नासाठीही कोर्टातून काला जठेडीला 6 तासांचा पॅरोल मिळाला होता.