काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 1998 मध्ये जेव्हा हरणाची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई केवळ पाच वर्षांचा होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्याचे वरिष्ठ नेता बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. फेसबुक पोस्टवर एका आरोपीने दावा केला आहे की, ही हत्या बिश्नोई गँगने केली आहे. पोलिसांनी अद्याप तरी एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा संबंध असल्याची पुष्टी दिलेली नाही. मात्र चित्रपट निर्माते गोपाल वर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपली बाजू मांडली आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 1998 मध्ये जेव्हा काळविटाची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई केवळ पाच वर्षांचा होता. बिश्नोईने 25 वर्षांपर्यंत सूडाची भावना कायम ठेवली आणि आता 30 व्या वर्षी तो म्हणतो की, सलमान खानची हत्या करणं हेच त्याचं लक्ष्य आहे. यातून त्याला काळविटाच्या हत्येचा बदला घेता येईल. यातून नेमकं काय समजून घ्यायचं, हे प्राण्यांविषयीचं प्रेम आहे का?

बॉलिवूड स्टार सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरण 1998 मध्ये राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालं होते. यामुळे काळविटाला देवस्थानी मानणाऱ्या बिश्नोई समाज नाराज झाला होता. साधारण 20 वर्षांनंतर 31 वर्षांच्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानच्या विरोधातील आपला राग सार्वजनिकरित्या व्यक्त केला. 2018 मध्ये जोधपूरमधील न्यायालयात हजर राहिल्यानंतर बिश्नोई म्हणाला की, आम्ही सलमान खानची हत्या करू. एकदा आम्ही कारवाईला सुरुवात केल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल. 

त्यावेळी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात हे प्रकरण तापलं. बिश्नोई गँगशी संबंधित दोन शूटरने वांद्रे येथील त्यांच्या घराबाहेर गोळी चालवली. आरोपीला अटकही करण्यात आली. 66 वर्षांचे बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. याच्या दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने सोशल मीडियावर हत्येची कबुली दिली. त्यावेळी यामागे बिश्नोई गँगचा समावेश असल्याचं समोर आलं. जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल, त्याला आपल्या हिशोब ठेवावा लागेल अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.