जाहिरात

Tarapur gas leak: तारापूरमधील MIDC मधे वायू गळतीत, 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची गर्दी रुग्णालयात झाली होती.

Tarapur gas leak: तारापूरमधील MIDC मधे वायू गळतीत, 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर
पालघर:

मनोज सातवी

तारापूर औद्योगिक वसाहतीतील मेडली फार्मास्युटिकल्स (प्लॉट F-13) या कारखान्यात वायू गळती झाली होती. या वायू गळतीत 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कामगार हे गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव या कामगारांचा समावेश आहे. तर, रोहन शिंदे आणि निलेश हाडळ या कामगारांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. 

नक्की वाचा- Pune News: पती पत्नी और वो! नवऱ्याच्या प्रेयसीला पत्नीने पकडलं, भर रस्त्यात अपहरणाचा थरार

तारापूर MIDC मधील प्लॉट नंबर F-13 मधील मेडली फार्मास्युटिकल्स हा औषधं निर्मिती कारखाना आहे. त्यात एलबेंडोझोल उत्पादन प्रक्रियेदरम्यान nitrogen गळती होऊन वायूच्या संपर्कात आलेल्या कामगारांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यात चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार बोईसर येथील शिंदे रुग्णालयात सुरू आहे. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची गर्दी रुग्णालयात झाली आहे. 

नक्की वाचा - Monsoon updates पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, राज्यात पूरपरिस्थिती गंभीर; कोट्यवधी नागरिकांना सतर्कतेचा संदेश

वायू गळती झाल्याचे समजताच एकच धावपळ उडावी. कामगारांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. शिवाय बचावासाठी बचाव दलही घटनास्थळी काही वेळात दाखल झाले. तोपर्यंत बऱ्या पैकी वायू कारखान्यात पसरला होता. त्याचा फटका कामगारांनाही बसला. त्यातून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर वायू गळती आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com