गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video

Gautami Patil Dance Infront of Bull : पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Gautami Patil Dance Infront of Bull : पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचे संकेत पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मिळत आहेत. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीचा सासरच्या मंडळींनी मोठा छळ केल्याचं उघड झालंय. हगवणे यांची आता अजित पवार यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण, या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्या पूर्व इतिहासातील सर्व गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवणे कुटुंबीयांनी यापूर्वी केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तुम्हाला वाचून खरं वाटणार नाही पण, हे खरं आहे. ज्यांच्या छळामुळे वैष्णवी आज या जगात नाही त्या हगवणे कुटुंबीयांनी यापूर्वी गौतमी पाटीलला एका बैलासमोर नाचवलं आहे. हगवणे कुटुंबीयांच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवशी त्यांनी चक्क गौतमीला बैलासमोर नाचवलं होतं. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Advertisement

संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील एका बैलासमोर नाचत होती. गौतमी स्टेजवर नाचत असताना नेहमी गर्दी करणारे तिचे चाहते इथं नाहीत. तर चक्क बैल तिथं उभा होता. गौतमीच्या मागे असलेला फोटो हा सुशील राजेंद्र हगवणेचा आहे. सुशील हा वैष्णवीचा दिर होता. 

Advertisement

याचाच अर्थ हगवणे कुटुंबीयांनी बैलाच्या वाढदिवसासाठी सुनेच्या माहेरकडून हुंडा उकळला आणि गौतमी पाटीलवर उधळला. 

( नक्की वाचा : Vaishnavi Hagavane : रस्त्यावर बाळ आणून दिले, हगवणेंना धमकी; वाचा विचित्र घटनांमागील Inside Story )
 

हगवणे कुटुंबीयांचा राजकीय दबदबा

हगवणे कुटुंबाचं प्रस्थ काय आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट त्यांच्या गावात पोहोचलो. राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशी तालुक्याचे माजी सभापती आहेत. हगवणे कुटुंब हे शेती आणि दुधाचा व्यवसाय करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हगवणे राजकारणामध्ये सक्रीय झाले. 

Advertisement

राजेंद्र हगवणेंनी 2004 साली राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यांचा मुलगा सुशीलही स्थानिक राजकारणामध्ये सक्रीय झाला होता. सुशील मुळशी तालुका युवक काँगेसचा अध्यक्ष होता. जिल्हा नियोजन समितीवर सुशीलची नियुक्ती झाली होती.  यंदा सुशील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होता. दुसरा मुलगा सुशांत हा शेती करतो.  

बैलाच्या वाढदिवसावर लाखो रुपये उधळणारे हगवणे कुटुंबीय हे सुनेला मात्र जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यायचे. त्यांचे प्रताप हे जनावरलाही लाजवणारे आहेत. त्यांना तातडीनं वेसण घालण्याची मागणी केली जात आहे.