जाहिरात

Vaishnavi Hagavane : रस्त्यावर बाळ आणून दिले, हगवणेंना धमकी; वाचा विचित्र घटनांमागील Inside Story

Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावरून मोठे वादळ उठले आहे. गुरुवारी वैष्णवीचे बाळ सुखरूपरित्या तिच्या आईवडिलांना मिळाले. मात्र हे बाळ मिळण्याआधी बराच ड्रामा घडला होता. 

Vaishnavi Hagavane : रस्त्यावर बाळ आणून दिले, हगवणेंना धमकी; वाचा विचित्र घटनांमागील Inside Story
मुंबई:

Vaishnavi Hagavane:  वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावरून मोठे वादळ उठले आहे. वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले मात्र तिला हालहाल करून ठार मारण्यात आले असा आरोप केला जात आहे. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राजेंद्र हगवणेंची सून होती. सुशील हगवणे हा राजेंद्र यांचा मुलगा असून हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 पक्षाकडून ही कारवाई होत असताना वैष्णवीचे बाळ कुठे आहे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा तिचे आईवडील प्रयत्न करत होते. मंगळवारी आणि बुधवारी वैष्णवी मृत्यूप्रकरणातील तपशील उजेडात येऊ लागल्यानंतर पोलिसांवर दबाव वाढू लागला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना फोन करून यात लक्ष घालण्यास सांगितले होते. गुरुवारी वैष्णवीचे बाळ सुखरूपरित्या तिच्या आईवडिलांना मिळाले. मात्र हे बाळ मिळण्याआधी बराच ड्रामा घडला होता. 

राजेंद्र हगवणेंच्या भावाला धमकी

वैष्णवीच्या काकांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले की, वैष्णवीचे चुलत सासरे प्रकाश हगवणे यांनी बुधवारी वैष्णवीच्या आईवडिलांना कर्वेनगरमधील औदुंबर सोसायटीमध्ये बोलावले होते. त्यांच्याकडे वैष्णवीचे बाळ होते. वैष्णवीच्या काकांनी सांगितलं की वैष्णवीचे बाळ रडते आहे तुम्ही त्याला घेऊन जा असे आम्हाला सांगण्यात आले होते. 

( नक्की वाचा : Vaishnavi Hagavane : हगवणे कुटुंबीयांना कोण वाचवतंय? रुपाली ठोंबरेंनी घेतलं IPS अधिकाऱ्याचं नाव )

वैष्णवीचे नातेवाईक (कस्पटे) जेव्हा कर्वेनगरातील फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा तिथे निलेश चव्हाणही आला. त्याने हगवणे आणि कस्पटे यांना धमकावले आणि तिथून जायला भाग पाडलं. निलेश चव्हाणने आम्हाला घाबरवण्यासाठी कंबरेला असलेल्या बंदुकीला हात घातला होता असेही कस्पटेंनी सांगितले. बाळ हे निलेश चव्हाणने आपल्या ताब्यात ठेवल्याचे कस्पटे यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

गुरुवारी सकाळी कस्पटे पुन्हा कर्वेनगरात बाळासाठी आले होते  त्यावेळी बाळ पिरंगुटला आहे असे सांगितले. कस्पटे पिरंगुटला निघाले असता चांदणी चौकात एका अज्ञात माणसाचा फोन आला. त्याने बाळ आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. वैष्णवीच्या काकांनी सांगितले की, बाणेरजवळ एक माणूस रस्त्यात उभा होता आणि त्याच्या हातामध्ये बाळ होते. त्या माणसाजवळ पोहोचताच त्याने बाळ आमच्या ताब्यात दिले आणि आम्ही मागे वळून बघेपर्यंत तो माणूस गाडीत बसून पळून गेला असे वैष्णवीच्या काकांनी सांगितले. त्या माणसाला मी पाहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com