रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग, नराधमाने उद्यानात नेलं अन्...

महाराष्ट्रात वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
ठाणे:

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कळवा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शेळके (42) असे त्या नराधमाचे नाव असून एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे.

आईसोबत सोमवारी कळवा रुग्णालयात आलेली 11 वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप याने मुलीला त्या ठिकाणच्या उद्यानात नेले. तेथे तो मुलीशी अश्लील चाळे करत असताना ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या निदर्शनास आली. दरम्यान, रुग्णालया परिसरात डाॅक्टरांचा संप सुरू आहे. त्या नातेवाईकाने त्या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डाॅक्टरांना दिली. डाॅक्टरांनी तत्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चोप देत ताब्यात घेतले. याशिवाय या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली.

Advertisement

Advertisement