काल पार्टी आज शोक..., गोव्याच्या नाइटक्लबमध्ये दुर्घटनेपूर्वीचं दृश्य; डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसले पर्यटक

Goa Night Club Fire: गोव्यात अरपोरामध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांवर उपचार सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Goa Night Club Fire
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • गोवा के बर्च बाय रोमियो लेन नाइट क्लब में देर रात तेज धमाके के बाद आग लग गई जिसमें जानमाल का नुकसान हुआ
  • आग लगने की घटना लगभग रात 12 बजे हुई, जिससे क्लब में मौजूद 25 लोगों की मौत हो गई
  • इस क्लब में देर रात डांस पार्टी चलने की बात सामने आ रही है, उस वक्त वहां 100 लोग मौजूद थे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
गोवा:

शनिवारी रात्री गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली आणि घाबरलेल्या लोकांनी बेसमेंटमध्ये पळ काढला. बेसमेंटमध्ये धूर जमा झाल्याने तब्बल २० जणांचा मृत्यू झाला. या नाइट क्लबमध्ये बॉलिवूड नाइट पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्या क्लबमध्ये पार्टी सुरू होती, तेथे आज शोक पसरला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, २५ लोकांच्या मृत्यू खेदजनक आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ४ पर्यटक आहेत. याशिवाय ७ जणांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. 

प्राथमिक तपासात, आग लागल्यानंतर लोक तातडीने बाहेर निघाले. मात्र काही लोक गर्दीमुळे तेथेच अडकले. तर काहींनी बेसमेंटमध्ये पळ काढला. येथे धूर जमा झाला होता. श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे आणि लवकरच अटक करण्यात येईल. 

आगीचं भयंकर दृश्य....

गोव्यात अरपोरामध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांवर उपचार सुरू आहे. क्लबच्या आत आग लागल्यामुळे खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, ही घटना रात्री १२ वाजेदरम्यान घडली. क्लबमध्ये आग लागल्याच्या घटनेवर एका प्रत्यक्षदर्शीने आयएएनएसशी बोलताना सांगितलं, आम्ही आपआपल्या हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. तोच आगीच्या ज्वाळा दिसून लागल्या. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचली होती आणि परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत होती. 

Advertisement

नक्की वाचा - 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन गोव्याच्या किनाऱ्यावर? कोकण अन् दक्षिणेचा प्लानही ऑन; रेल्वेने दिली Good News

आग लगने के बाद का मंजर

दुर्घटनेची तीव्रता सकाळी आली लक्षात...

एका स्थानिक व्यक्तीने सांगितलं, आम्ही जवळच होतो. ही दुर्घटना १२ वाजेदरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यावेळी काहीच लक्षात आलं नाही.  सकाळी बातमी पाहून मी तातडीने येथे पोहोचलो. दुसऱ्या एका स्थानिकाने सांगितलं, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे आम्हाला त्यावेळी फारसं काही दिसलं नाही. मी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकला आणि सकाळी मला कळलं की, कदाचित २५ लोकांचा मृत्यू झाला असेल. अर्पोरा येथे लागलेल्या भीषण आगीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जण जखमी झाले आहेत याची पुष्टी केली. सर्व सहा जखमींची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी घटनास्थळाला भेट दिली. घटनेवर दुःख व्यक्त करत त्यांनी कारण निश्चित करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले. 

Advertisement