Gold News: बिर्याणी खाऊ घातली, कोल्ड ड्रिंकही पाजलं... मग 1KG सोनं पोटातून बाहेर पडलं; पोलीसही चक्रावले

Gold Capsules News: डॉक्टरांनी 'एनिमा'च्या माध्यमातून कॅप्सूल बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि मग त्यांच्या शरीरातून सोन्याच्या तब्बल 29 कॅप्सूल बाहेर पडल्या. काय आहे हा प्रकार?

जाहिरात
Read Time: 3 mins

Gold Capsules News: दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या चार जणांकडून तब्बल एक किलो सोने जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तस्करांनी इतकं सोने पोटामध्ये लपवलं होतं. पोलिसांनी 35-35 ग्रॅम वजनाच्या एकूण 29 कॅप्सूल जप्त केल्या आहेत, या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. गजाआड करण्यात आलेल्या तस्करांचा सोने तस्करीशी संबंधित असलेल्या मोठ्या टोळीमध्ये समावेश आहे, यांचा मुख्य सूत्रधार रामपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रत्येक 50-50 हजार रुपये मिळाल्याचीही माहिती पोलिसांना मिळालीय. गेल्या सहा महिन्यांतील त्यांची ही सहावी फेरी होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तस्करीचा खुलासा आणि अपहरण 

रामपूरमधील मुतलिब, शाने आलम, जुल्फिकार आणि अजरूद्दीनला आठ दिवसांपूर्वी सोने तस्करीसाठी दुबईमध्ये पाठवण्यात आले होते. जेथे या चौघांनी 35-35 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कॅप्सूल गिळल्या आणि शुक्रवार (23 मे) सकाळी चारही जण दुबईहून मुंबईमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचले. येथे त्यांची भेट सौदी अरेबियातून परतलेले त्यांचे शेजारी मोहम्मद नावेद आणि जाहिदसोबत झाली. चालक जुल्फिकार त्यांना घेऊन जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. सर्वजण कारमध्ये बसून रामपूरच्या दिशेने प्रवास करू लागले. पण मुरादाबादमध्ये लखनौ-दिल्ली हायवेवर एका टोळीने त्यांचे अपहरण केले. यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन जणांसह तस्करांनाही ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

(नक्की वाचा: लग्न मंडपात नवरा- नवरी, वरमाळा घालणार तेवढ्या बॉयफ्रेंड आला, अन् पुढे जे घडलं ते...)

तस्करांच्या पोटातून निघाले सोने  

पोटामध्ये सोने असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तस्करांची अल्ट्रासाउंड टेस्ट केली, ज्यामुळे काहीही मदत झाली नाही. यानंतर एक्स-रे काढल्यानंतर कॅप्सूलबाबतची माहिती समोर आली आणि डॉक्टरांच्या देखरेखी अंतगर्त सोने पोटातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. शनिवार (24 मे) उशीरा रात्रीपर्यंत चारही तस्करांच्या पोटातून सोन्याचे नऊ कॅप्सूल बाहेर पडले, रविवार पुन्हा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यावेळेस तस्करांना बिर्याणी, कोल्ड ड्रिंक, केळी आणि औषधे देण्यात आले; जेणेकरुन शौचाच्या माध्यमातून कॅप्सूल बाहेर पडतील. चार वेळा केलेल्या या प्रक्रियाद्वारे एकूण 29 कॅप्सूल सापडले.  

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Snake Scam: बापरे! एकाच व्यक्तीचा 30 वेळा मृत्यू अन् थेट करोडपती, हादरवणारा 'स्नेक स्कॅम' उघडकीस)

कस्टम विभागाची चौकशी

तस्करांना जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये देखरेखी अंतर्गत ठेवण्यात आले होते. दरम्यान आणखी कॅप्सूल पोटात आहेत की नाहीत? हे तपासण्यासाठी सर्व तस्करांचे पुन्हा एक्स रे काढण्यात येणार आहेत. दिल्लीहून आलेले कस्टम विभागाचे पथक देखील तस्करांची चौकशी करत आहे. 

टोळीच्या म्होरक्याला कधी करणार गजाआड?  

टोळीच्या म्होरक्या रामपूरमध्ये असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, टोळीच्या सूत्रधाराला गजाआड करण्यासाठी तपास मोहीम सुरू करण्यात आलीय. तसेच कस्टम विभागाच्या पथकाच्या मदतीने तस्करांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.