Nikki Murder Case : 'बाबांनी आईला जिवंत जाळलं' मुलाचा Video Viral, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ

Nikki Murder Case Greater Noida: या घटनेनंतर निक्कीच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो "पप्पांनी आईला लायटरने जाळले" असे म्हणताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nikki Murder Case : निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जाळण्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
मुंबई:

Nikki Murder Case Greater Noida: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिरसा गावातील निक्की नामक महिलेला हुंड्याच्या मागणीसाठी मारहाण करून नंतर जाळून मारण्यात आले. निक्कीचा विवाह डिसेंबर 2016  मध्ये विपिनसोबत झाला होता. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जाळण्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्यावरील क्रूरता स्पष्टपणे दिसते. या घटनेनंतर निक्कीच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो "पप्पांनी आईला लायटरने जाळले" असे म्हणताना दिसत आहे, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

35 लाख रुपयांची मागणी आणि छळ

निक्कीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नात स्कॉर्पिओ गाडी आणि इतर अनेक वस्तू दिल्या असूनही सासरच्या लोकांची 35 लाख रुपयांची मागणी सुरूच होती. निक्कीची बहीण कंचन हिने सांगितले की, 21 ऑगस्ट रोजी निक्कीचा पती विपिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली.त्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सुरुवातीला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, पण वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.

( नक्की वाचा : मुंबईत क्रौर्याचा कळस! 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्रेनच्या कचरापेटीत सापडला )
 

एकाच कुटुंबात दोन बहिणींचा विवाह

कंचनने सांगितले की, तिचे आणि निक्कीचे एकाच कुटुंबात लग्न झाले होते. कंचनचा विवाह रोहितसोबत आणि निक्कीचा विवाह विपिनसोबत झाला होता. दोन्ही बहिणींना लग्नानंतर सातत्याने सासरच्यांकडून त्रास दिला जात होता. अनेकदा पंचायत करून समेट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सासरचे लोक ऐकायला तयार नव्हते.

पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. कासना पोलीस ठाण्यात मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीवरून पती विपिन, दीर रोहित, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निक्कीला न्याय मिळवून देण्यासाठी कासना पोलीस ठाण्याबाहेर 'जस्टिस फॉर निक्की बहन' असे फलक घेऊन मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Advertisement

ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी दखल घेतली. सध्या आरोपी पती विपिनला ताब्यात घेण्यात आले आहे आणि इतर आरोपींना पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल.

Topics mentioned in this article