जाहिरात

Mumbai News : मुंबईत क्रौर्याचा कळस! 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्रेनच्या कचरापेटीत सापडला

Mumbai LTT Station : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्टेशनवर एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

Mumbai News :  मुंबईत क्रौर्याचा कळस! 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्रेनच्या कचरापेटीत सापडला
Mumbai News : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
मुंबई:


Mumbai LTT Station : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्टेशनवर एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कुशीनगर एक्स्प्रेस (22537) ट्रेनच्या एसी कोचमधील बाथरूमच्या कचरापेटीत (डस्टबिन) एका 3 वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

ही धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. ट्रेन रात्री सुमारे 1:05 वाजता प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचली होती. ट्रेनची साफसफाई सुरू असताना, कर्मचाऱ्यांना बाथरूममधील डस्टबिनमध्ये काहीतरी संशयास्पद दिसले. जवळून पाहिल्यावर त्यांना एका लहान मुलाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती रेल्वे आणि पोलिसांना दिली.

( नक्की वाचा : Vasai News : वसईच्या ‘दबंग' PSI ला धक्का, बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग उघड होणार? )
 

आईने आधीच दाखल केली होती तक्रार

या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या आईने एक दिवस आधीच गुजरातच्या अमरोली पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तिने तिचा 25 वर्षांचा चुलत भाऊ विकास शाह याच्यावर अपहरणाचा आरोप लावला होता. पोलीस आता याच दिशेने तपास करत आहेत, मात्र सध्या आरोपी फरार आहे.

रेल्वे आणि जीआरपी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची शक्यता

या घटनेबाबत रेल्वे आयुक्त राकेश काला सागर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या मुलाची बेपत्ता झाल्याची तक्रार सुरत येथे दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी सुरत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस मुलाचा शोध घेत होते. रेल्वे आयुक्तांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये कौटुंबिक वादामुळे आरोपीने हे भयंकर कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com