- ग्रेटर नोएडा में निक्की को उसके पति और ससुराल वालों ने दहेज विवाद के कारण जिंदा जला दिया
- निक्की और उसकी बहन कंचन की शादी एक ही घर में दिसंबर 2016 में हुई थी
- निक्की के पति विपिन के कई महिलाओं के साथ संबंध थे और निक्की को पता चलने पर उनके बीच विवाद चल रहा था
Nikki Dowry Death Case: स्वत:च्या घरात निक्कीला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाल. यानंतर तिला जिवंत जाळलं. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळण्यात आलं. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे.हा खुलासा निक्कीची मोठी बहीण कांचनने केला होता. निक्की आणि कांचन यांचं लग्न एकाच घरात झालं होतं. 2016 मध्ये दोन्ही बहिणींनी एकाच मांडवाखाली लग्न झालं होतं. माहेरच्यांनी दोन्ही बहिणींच्या लग्नात भरपूर सोनं आणि कार आदी वस्तू दिल्या होत्या. मात्र तरीही निक्कीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली.
21 ऑगस्टला निक्कीची हत्या
शनिवारी ग्रेटर नोएडातील एका कुटुंबाच्या सुनेची अत्यंत निघृणपणे हत्या झाली. ही घटना 21 ऑगस्टची आहे. निक्कीला तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं. या घटनेसंदर्भात अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
8-9 दिवसांपासून सुरू होता वाद
निक्कीची बहीण कांचनने एनडीटीव्हीशी खास संवाद साधताना या घृणास्पद गुन्ह्यामागील कहाणी सांगितली. कांचनने सांगितलं की, गेल्या ८-९ दिवसांपासून निक्की आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू होता. निक्कीची बहीण कांचनचा दावा आहे की, निक्कीचा पती विपिनचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते, ज्याची माहिती निक्कीला मिळाली आणि या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला.
सर्व ठरवून करण्यात आलं - कांचन
कांचनने सांगितलं की, 21 ऑगस्टला वाद इतका वाढला की, निक्कीला तिच्या सासरच्या मंडळींनी मारून टाकलं. 21 तारखेला निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात आली. त्यावेळी कांचनने याचा व्हिडिओ केला. हे सर्व अचानक झालं नाही तर सर्व काही ठरवून झाल्याचं कांचनने सांगितलं.
विपिन रात्रभर घरी येत नव्हता..
कांचन पुढे म्हणाली, हे 8 दिवसांपासून सुरू होतं. आम्ही बाबांना विपिन रात्रभर घरी येत नसल्याचं सांगितलं होतं. निक्कीने त्याला याबाबत विचारलं होत. यावर तो तिला मारहाण करीत होता. बहीण खूप नाराज झाली होती, तिने वडिलांना याबाबत सर्व काही सांगितलं. वडिलांनीही तिला समजावून सांगितले. जेव्हा बहिणीने वडिलांना बोलावून घेतलं, तेव्हा सासू यावर रागावली होती.
वडिलांनी हुंड्यात टॉप मॉडेल स्कॉर्पियो दिली होती
निक्कीच्या वडिलांनी हुंड्यात टॉप मॉडेलची स्कॉर्पियो, बुलेट आणि कॅश दिली होती. तरीही तो निक्कीला मारहाण करीत होता. कांचनने सांगितलं की, माझ्या डोळ्यासमोर बहिणीला जिवंत जाळलं. मी तिला वाचवू शकले नाही. निक्कीच्या पतीचे अनेक मुलींसोबत संबंध असल्याचंही कांचनने सांगितलं.