मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य

Gujarat Principal kills girl : सहा वर्षांची चिमुरडी  शाळेच्या मुख्याध्यापकाचं बोट धरुन रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सहा वर्षांची चिमुरडी  शाळेच्या मुख्याध्यापकाचं बोट धरुन रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी मुलीच्या घरी आला. मुलीच्या आईनं मोठ्या विश्वासानं चिमुरडीला त्याच्यासोबत शाळेत पाठवलं. ती मुख्याध्यपकाच्या कारमध्ये बसली. पण, शाळेत पोहचलीच नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकानं जेव्हा सत्य शोधलं त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गुजरातमधल्या दाहोद जिल्ह्यात 6 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण उघड झालं आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्या या चिमुरडीची तिच्या शाळेतल्या मुख्याध्यपाकानंच हत्या केली. मुख्याध्यापकाला दुष्कर्म करण्यास तिनं प्रतिकार केला. त्यामुळे त्यानं मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या परिसरात फेकला. मुलीच्या बूट आणि बॅगेची देखील विल्हेवाट लावली. पोलिसांनी या प्रकरणात 55 वर्षांच्या गोविंद नट या मुख्याध्यपकाला अटक केलं आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी राजदीप सिंह झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी शाळेच्या परिसरात आढळला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टममधून मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांची टीम नियुक्त केली होती.  

( नक्की वाचा : Akshay Shinde Encounter : 'अक्षयला एन्काऊन्टरपूर्वीच तुरुंगात चिठ्ठी आली होती', आईची पहिली प्रतिक्रिया )
 

मुख्याध्यपकाच शाळेत नेत असे

मुलीच्या आईनं सांगितलं की, '6 वर्षांची चिमुरडी रोज गोविंदबरोबरच शाळेत जात होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. त्यावेळी आपण, तिला शाळेत सोडलं आणि  कामासाठी बाहेर गेलो. त्यानंतर मुलीसोबत काय झालं?  हे माहिती नाही, अशी जबानी दिली होती. 

Advertisement

कसा लागला छडा?

पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच मुख्याध्यपकाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्याने गोविंदच्या फोन लोकेशनचे डिटेल्स मागवले. त्यानंतर त्यांचा संशय पक्का झाला. पोलिसांनी त्याची कठोरपणे चौकशी केली. त्यानंतर त्यानं अखेर सर्व सत्य सांगितलं. 

( नक्की वाचा : Akshay Shinde Encounter नंतर हैदराबादमधील प्रकरण चर्चेत, 5 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? )
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर एक दिवसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यामध्ये त्याचा मृत्यू गळा दाबून झाला, हे स्पष्ट झालं. मुलगी शाळा संपल्यानंतरही घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी ती शाळेच्या परिसरात इमारतीच्या मागं बेशुद्ध अवस्थेत आढळली. मुलीला लिमखेडा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.'
 

Advertisement