Crime News : 50 लाखांची रक्कम आणि पुतळ्याचा 'मृत्यू'; कपडा व्यापाऱ्यांच्या कृत्याने सारेच हादरले

पैशांच्या लालसेपोटी एखादी व्यक्ती इतक्या टोकाला जाऊ शकते असा विचारही कोणी केला नसेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

कफनमध्ये लपटून आणलेला मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचला, त्याच्यावरील चादर हटवली तर सर्वांना धक्काच बसला. पैशांच्या लालसेपोटी एखादी व्यक्ती इतक्या टोकाला जाऊ शकते असा विचारही कोणी केला नसेल. ही घटना दिल्लीतील कपड्याच्या व्यापाऱ्यांची आहे. दिल्लीतील कपड्याच्या दोन व्यापाऱ्यांनी पैशांसाठी मृत्यूचा प्लान आखला. त्यांना ५० लाखांची विम्याची रक्कम हवी होती. ५० लाख रुपये आणि व्यापाऱ्यांमध्ये शेवटचा टप्पा शिल्लक होता. मात्र येथे व्यापाऱ्यांकडून चूक झाली आणि त्यांचा अख्खा प्लान कोलमडला. 

काय होता प्लान? 

या प्रकरणात दिल्लीतील कपडा व्यापारी सोमानी आणि आशीष खुराना यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी कमलने सांगितलं की, दिल्लीतील करोल बागमध्ये त्याचं कपड्याचं दुकान आहे आणि त्याच्यावर ५० ते ५५ लाखांचं कर्ज आहे. याशिवाय दुकान तोट्यात आहे. दुसरीकडे व्याज वाढत चाललंय. त्याच दुकानावर अंशुल कुमार गेल्या अनेक वर्षांपासून सेल्समनचं काम करीत होता. साधारण एक वर्षांपासून त्याने अंशुलकडून काही कामाच्या निमित्ताने आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि स्वाक्षरी घेतली. या कागदपत्रांच्या आधारावर त्याने टाटा एआय लाइफ विमा कंपनीत अंशुल कुमारच्या नावाने ५० लाखांची जीवन विमा पॉलिसी घेतली. सर्व प्रीमियम तो स्वत:च भरत होता. त्यामुळे पॉलिसी सक्रिय होती. 

Advertisement

कमन सोमानीने सांगितलं, २१ नोव्हेंबर आणि २२ नोव्हेंबरला त्याने आपल्या साथीदारांना सांगितलं, अंशुलची तब्येत बिघडलीये आणि त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. २६ नोव्हेंबरला त्याने अंशुल मृत झाल्याची अफवा पसरवली. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सीलबंद केलेला ताबूत कमल आणि आशीषला सोपवलं. यानंतर आरोपी प्लास्टिकच्या पुतळ्याचा मृतदेह घेऊन हापुडच्या ब्रजघाट स्मशानभूमीत पोहोचले. येथे कर्मचाऱ्यांनी जेव्हा कफनवरील कपडा काढला तर त्यात पुतळा होता. हे पाहून दोन्ही व्यावसायिकांनी पळ काढला. शेवटी दोघांना पकडलं आणि पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. 

नक्की वाचा - Nagpur News: क्रिप्टोकरन्सी-शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचं आमीष; दोन प्रकरणाती साडेतीन कोटींचा गंडा


विम्याच्या पैशांसाठी घाट

व्यापाऱ्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या अंशुलच्या नावावर ५० लाखांचा विमा केला होता. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांना येथून स्मशानभूमीकडून पावती मिळाली असती तर त्या आधारावर मृत्यूपत्र तयार करीत त्यांनी ५० लाखांचा क्लेम केला असता. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा अंशुलला याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा तो प्रयागराजच्या घरी होती. त्याला विम्याची माहितीही नव्हती.