Shocking News: अख्ख कुटुंब संपलं, एकाच घरातील 7 जणांनी आयुष्य संपवलं, कारमध्ये बसले अन्...

Haryana panchkula Family News: पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

हरियाणा: एकाच घरातील सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याची भयंकर घटना हरियाणामध्ये घडली आहे. हरियाणातील पंचकुला परिसरात ही घटना घडली. पती-पत्नी त्यांची तीन मुले आणि एका वृद्धाचा मृतांमध्ये समावेश आहे. या सर्वांनीही विष प्राशन करुन आपले आयुष्य संपवले. एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह आढळले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची  हृदयद्रावक घटना हरियाणामधील पंचकुला येथे घडली आहे. आत्महत्या करणारे कुटुंब डेहराडूनचे होते. पंचकुलाच्या सेक्टर 27 मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह आढळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या कर्जामुळे आणि आर्थिक संकटामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आणि गाडीतच विष प्राशन केले. 

देहरादून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर, देहरादूनला परतत असताना त्यांनी सामुहिक आत्महत्या केली. प्रवीण मित्तल हे 42 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत प्रवीणचे आई वडील, प्रवीणची पत्नी, दोन मुली आणि एका मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले होते.

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)

पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था अमित दहिया यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासणीसाठी नमुने गोळा केले. पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांच्या मते, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मृतांची ओळख पटली आहे.

Advertisement

दरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की प्राणिनने अलीकडेच डेहराडूनमध्ये टूर आणि ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला होता. त्याने त्याच्या व्यवसायात खूप पैसे गुंतवले होते. पण यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत व्यवसायातील तोट्यामुळे प्रवीणचे कुटुंब कर्जात बुडाले. त्याच्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण झाले होते. म्हणूनच कुटुंबाने आत्महत्या केली.