Aurangzeb Tomb : खुलताबादमध्ये मोठा बंदोबस्त तैनात, संशयास्पद आढळल्यास 'या' नंबरवर संपर्क करा

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर काढून फेकण्याची मागणी हिंदू संघटनांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून नागपुरात हिंसाचाराची घटना देखील समोर आली. अशात ज्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी आता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनायककुमार राठोड यांनी खुलताबादमध्ये बैठक देखील घेतली. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरात शांतता राखणे हे आपले कर्तव्य असून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 30 पोलीस, राज्य राखीव बल गटाची 50 जवानांची एक तुकडी, एकूण 80 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची नोंद घेतली जात आहे. 24 तास पोलिसांचा बंदोबस्त  आहे. संपूर्ण खुलताबाद परिसरात ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केले जात आहे. पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंग केलं जात आहे. 

नक्की वाचा - Drugs Smuggling : पाकिस्तानातून ड्रोनने मागवायचा ड्रग्ज, ठिकाणही ठरलेलं; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी त्यांच्यामार्फत ग्रामसुरक्षा ॲपवर माहिती द्यावी. 18002703600 असा ग्राम सुरक्षा ॲपचा क्रमांक आहे. शिवाय नागरिक 112 या क्रमांकावरही माहिती देऊ शकतात. आपल्या परिसरात शांतता राखणे हे आपले कर्तव्य असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

याशिवाय पोलीस सोशल मीडियाबाबत अत्यंत दक्ष असून चुकीची माहिती अथवा भावना भडकवणाऱ्या मजकुरावर सायबर सेलमार्फत लक्ष देण्यात येत आहे. अशा वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

Advertisement