तळवलीतून 8 लाख 13 हजाराचे हेरॉईन जप्त

नवी मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात अंमली पदार्थ सेवन व विक्री करणार्‍यां विरोधात कारवाईचे सत्र सुरु केले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी मुंबई:

नवी मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात अंमली पदार्थ सेवन व विक्री करणार्‍यां विरोधात कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यानुसार रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत घणसोलीच्या तळवली परिसरातील झोपडपट्टी भागातून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 54.26 ग्रॅम हेरॉईन अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केला आहे. त्याची किंमत 8 लाख 13 हजार 900 रुपये ऐवढी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

या प्रकरणी आरोपी अजय जाधव (२६) याला अटक करण्यात आली आहे. तो गोल्डननगर नोसील नाका तळवली इथे राहतो. एक इसम हा घणसोलीत अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला  मिळाली होती. त्यानुसार तळवलीच्या नोसिल परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी अजय जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे खडे व पावडर सारखा काळा तपकिरी रंगाचा हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी अजय जाधव याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.