तरुणांचे भविष्य घडवण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा धंदा चालवत असल्याचा प्रकरा समोर आहे. हे सर्व एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 5 जणांना अटकही केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 'एफेबल डिझाइन कंपनीज' नावाचे एक मोठे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे. तीथे हा सर्व घाणेरडा प्रकार सुरू होता.
हा प्रकार मेरठच्या नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बाहेरून पाहता हे एक सामान्य कॉम्प्युटर सेंटर दिसत होते. ज्यावर एक मोठा आणि आकर्षक बोर्ड लावलेला होता. परंतु आतमध्ये वेश्याव्यवसायाचा अवैध धंदा सुरू होता. हा धंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवला जात होता. जिथे ग्राहकांना मुलींचे फोटो ऑनलाइन पाठवले जात होते. त्यातून मुली सिलेक्ट केल्या जात होत्या. त्या मुली ग्राहकांना पुरवल्या जात होत्या. हे सर्व सर्वांच्या समोर होत होतं.
पोलिसांना गुप्तहेराकडून या धंद्याची माहिती मिळाली होती. सीओ सिव्हिल लाइन्स अभिषेक तिवारी यांच्या नेतृत्वाखाली नौचंदी आणि मेडिकल पोलीस ठाण्याच्या पथकांनी एकत्र येऊन कॉम्प्युटर सेंटरवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच सेंटरमध्ये गोंधळ उडाला आणि लोक पळू लागले. पण पोलिसांची मोठी संख्या असल्यामुळे कुणालाही तिथून पळून जाणे शक्य झाले नाही. छापेमारीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रिसेप्शनिस्टसह 9 मुलींची सुटका केली. याव्यतिरिक्त, 4 तरुणांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी महिलांसह एकूण 5 जणांना अटक केली आहे. ज्यांची ओळख राजवीर, साकलम, नवाजिश, माज आणि आसमा सचदेवा अशी झाली आहे. हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी, दोन दिवसांपूर्वीच मेरठच्या कबाडी बाजारमध्ये पाच कोठ्यांवर छापा टाकण्यात आला होता. जिथून नेपाळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थानसह अनेक राज्यांतील 17 तरुणींची सुटका करण्यात आली होती. पोलिसांच्या या सततच्या कारवाईवरून हे स्पष्ट होते की मेरठमध्ये वेश्याव्यवसायाचे अनेक गट सक्रिय आहेत, जे अनेक महिन्यांपासून सुरू होते आणि पोलिसांना त्यांची खबर नव्हती. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.