जाहिरात

उर्दू शिकवणारा शिक्षक, व्यापारी मित्र अन् पाकिस्तानचा व्हॉटसअप ग्रुप, काय आहे नागपूर कनेक्शन?

सध्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी डिजिटल मॉनिटरिंगला प्राधान्य दिले आहे.

उर्दू शिकवणारा शिक्षक, व्यापारी मित्र अन् पाकिस्तानचा व्हॉटसअप ग्रुप, काय आहे नागपूर कनेक्शन?
नागपूर:

Nagpur News: एका उर्दू शिक्षकासह दोन व्यक्तींना महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जुनी मस्जिदजवळच्या जुन्या कामठी भागातून शनिवारी पहाटे ताब्यात घेतले होते. पाकिस्तानमधील जिहादी सोशल मीडिया ग्रुपशी त्यांचा संबंध असल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. अलिकडील भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप ग्रुपमधील सक्रिय सदस्य असलेल्या उर्दू शिक्षकाची आणि त्याच्या एका व्यापारी मित्राची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोन मधील डेटा जप्त करून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र त्यांच्यावर अजूनही पाळत ठेवली जात असून गरज भासल्यास त्यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

नक्की वाचा - Pune News: मशिदीखाली आढळलं भुयार, मंचरमध्ये एकच खळबळ, नक्की प्रकार काय?

यापैकी प्रमुख संशयित जुनी कामठी येथील जुन्या मशिदीजवळील 42 वर्षीय रहिवासी एका प्रसिद्ध उर्दू शाळेत शिक्षक असून तो एक यूट्यूब चॅनलही चालवतो. तो गेल्या दहा वर्षांपासून एका पाकिस्तानी व्हॉटसअप ग्रुपवर सक्रीय आहे. त्याचा 40 वर्षीय मित्र दुसरा संशयित आहे. त्याला सदर शिक्षकाशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे आणि या पाकिस्तानी व्हॉट्सॲप ग्रुपवर सक्रीय असल्याने त्याचीही चौकशी करण्यात आली. दोघांनीही सोशल मीडिया ॲप वरून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधल्याचे देखील या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, दोघे एका खासगी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय होते. ज्याचे संचालन पाकिस्तानमधील एका व्यक्तीद्वारे केले जात होते. त्यात 500 हून अधिक सदस्य होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपवर पाकिस्तानी लष्करी कारवाईचे महिमामंडन करणारे व्हिडिओ, धार्मिक मजकूर, भारतीय सशस्त्र दलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या आणि भारतातील 'बहुसंख्याक समुदायाविरुद्ध एकत्र येण्याचे' आवाहन करणारी पोस्ट टाकली जात होती.

नक्की वाचा - Nagpur News : नागपुरात उड्डाणपूल थेट घरात घुसला; वाचा काय आहे का कधीही न झालेला प्रकार....

सध्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी डिजिटल मॉनिटरिंगला प्राधान्य दिले आहे. एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या सारख्या संस्था अशा संवादांचा मागोवा घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय  परदेशी हाताळणी करणाऱ्यांकडून संभाव्य निधी किंवा समन्वयाचा शोध घेण्यासाठी प्रगत डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये अलीकडील अशाच प्रकरणांमध्ये केलेल्या अटकांमधून अशा कारवायांवरील देशव्यापी कृती करण्यात येत असल्याचे दिसून येते. समाज माध्यमावरील बेजबाबदार किंवा खोडसाळ मजकुराला पायबंद घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील एजन्सींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मॉनिटरिंगला अधिक महत्त्व देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः ज्या ग्रुपचे परदेशी संबंध आहेत, त्यांचेवर नजर ठेवली जात आहे. यामध्ये संशयास्पद अकाउंट्सचा रिअल-टाइम मागोवा घेणे, हानिकारक मजकूर दर्शवण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांशी सहकार्य करणे आणि बेकायदेशीर गतिविधी (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) कायदेशीर कारवाई करणे यांसारख्या कारवायांचा समावेश आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com