समाधान कांबळे
किरकोळ वादावरून पत्नीने पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये पतीने पत्नीला जेवण मागिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे संतप्त पत्नीने पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून पत्नीने ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याचीही चर्चा सध्या जोरदार पणे सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रात्रीच्या सुमारास पत्नी जेवणासाठी कांदा कापत होती. त्यावेळी पतीने जेवण अजून का तयार झाले नाही अशी विचारणा पत्नीला केली. असं विचारल्यामुळे पत्नीला संताप झाला. तिला प्रचंड राग आला. त्या रागाच्या भरात संतप्त पत्नीने पतीच्या गुप्तांगावर कांदा कापण्याच्या चाकूने सपासप वार केले. त्यात पती गंभीर जखमी झाला आहे. जखमी पतीच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी विरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट
या प्रकरणात पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या दिसतात. शुल्लक कारणावरून भांडण होतं. त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं जातं. मात्र त्यात संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त होत आहे. त्याच विचार मात्र कुणी ही करत नाही. या प्रकरणातही असेच झालेले दिसते. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.