Holi 2026: रंग खेळताना मर्यादा ओलांडली तर खैर नाही! तुमच्या सुरक्षिततेसाठी 'हे' नियम आहेत सज्ज, वाचा सविस्तर

Holi Colour Consent Law India: होळीच्या उत्साहात 'बुरा ना मानो होली है' म्हणत कोणावरही जबरदस्तीने रंग टाकणे आता महागात पडू शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Holi 2026: कुणी तुमच्या संमतीशिवाय रंग लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होऊ शकते. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Holi Colour Consent Law India: होळीच्या उत्साहात 'बुरा ना मानो होली है' म्हणत कोणावरही जबरदस्तीने रंग टाकणे आता महागात पडू शकते. रंगांचा हा सण आनंदाचा असला तरी, कोणाच्याही इच्छेविरुद्ध त्याला रंग लावणे, स्पर्श करणे किंवा त्रास देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. 

भारतीय कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सुरक्षा, गोपनीयता आणि सन्मानाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणी तुमच्या संमतीशिवाय रंग लावण्याचा प्रयत्न केला, तुमचा पाठलाग केला किंवा छेडछाड केली, तर अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये कठोर कारवाई केली जाऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील दीपक ठुकराल यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय आहे शिक्षा?

भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 नुसार, कोणत्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला स्पर्श करणे, जबरदस्तीने रंग लावणे किंवा मिठी मारणे हा दंडनीय अपराध आहे. पूर्वी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 अंतर्गत नोंदवला जात असे. आता या नव्या कलमानुसार दोषीला 1 ते 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. 

तसेच कलम 75 अंतर्गत लैंगिक छळवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. यामध्ये महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संपर्क करणे, अश्लील हावभाव करणे किंवा तिला अस्वस्थ वाटेल असे वर्तन करणे समाविष्ट आहे. अशा गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Amravati News: 75 वर्षांपासून 'या' गावात विकला गेला नाही एकही रंग; पिचकारी शोधूनही सापडणार नाही, काय आहे गूढ? )
 

कलम 79 नुसार, कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्द वापरणे किंवा अश्लील इशारे करणे हा देखील गुन्हा मानला जातो. होळीच्या नावाखाली अभद्र टिप्पणी करणाऱ्यांना या कलमांतर्गत 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास सोसावा लागू शकतो. शारीरिक दुखापत पोहोचवणाऱ्यांसाठी कलम 115 (2) लागू होते. 

कुणी रासायनिक रंगांचा वापर करून कोणाच्या त्वचेला इजा पोहोचवली किंवा रंग लावताना धक्काबुक्की केली, तर 1 वर्षांपर्यंत कैद किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कलम 270 नुसार कारवाई केली जाते. रस्त्यावर आरडाओरडा करणे, बळजबरीने पाणी फेकणे किंवा लोकांच्या येण्याजाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करणे हे सार्वजनिक उपद्रवाच्या श्रेणीत येते.

Advertisement

( नक्की वाचा : Chandra Grahan 2026: वर्षातील पहिले चंद्र ग्रहण, सुतक काळापासून ते राशीभविष्यापर्यंत; वाचा 10 प्रमुख मुद्दे )

महिलांना विशेष संरक्षण?

प्रत्येक महिलेला किंवा तरुणीला रंग लावण्यासाठी नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. संमतीशिवाय गुलाल लावणे हा चेष्टा-मस्करीचा भाग नसून तो कायदेशीर गुन्हा आहे. 'होळी आहे' असे म्हणून कोणीही या गुन्ह्यातून सुटू शकत नाही. अशा घटनांची तक्रार केल्यास पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाते आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहून आरोपीला तात्काळ अटक देखील केली जाऊ शकते. त्यामुळे यंदाची होळी खेळताना समोरच्या व्यक्तीच्या संमतीचा आदर करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे.
 

Topics mentioned in this article