जाहिरात

Home Loan आयुष्यातील सर्वात मोठी चूक; कॅनरा बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाने लग्नापूर्वी उचललं टोकाचं पाऊल

कॅनरा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापनकानेच गृहकर्जावरुन टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाबमध्ये १२ दिवसानंतर त्यांचं लग्न होणार होतं.

Home Loan आयुष्यातील सर्वात मोठी चूक; कॅनरा बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाने लग्नापूर्वी उचललं टोकाचं पाऊल

कॅनरा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापनकाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सहाय्यक व्यवस्थापकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. यावेळी घटनास्थळावरील सुसाइड नोटही सापडली आहे. यामध्ये त्यांनी स्वत:च्या चुकांचा उल्लेख केला आहे. धक्कादायक म्हणजे १२ दिवसांनी म्हणजेच २८ डिसेंबरला त्यांचं लग्न होणार होतं.

हॉटेलमध्येच घेतला गळफास...

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधील राबर्टसगंज स्थित सवेरा हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला. या हॉटेलमधील २१० क्रमांकाच्या रुममध्ये ३३ वर्षीय जफर अब्बास याचा मृतदेह सापडला. अब्बास जैदी कॅनरा बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. सोमवारी ते बँकेच्या रिकवरीच्या कामासाठी सोमभद्र येथे आले होते. काम झाल्यानंतर त्यांनी सवेरा हॉटेलमध्ये राहण्याची रुम बुक केली होती. मंगळवारी सकाळी त्यांच्या खोलीबाहेर नाश्ता ठेवला होता. मात्र बराच वेळ ते बाहेर आले नाही. शेवटी रात्री हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीच दार तोडलं. त्यावेळी आतील दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला.

Crime News :आंतरधर्मीय विवाह अन् आई-वडिलांचे तुकडे; भावनांचा तीव्र आक्रोश, अशी घटना जी वाचून अंगाचा थरकाप उडेल

नक्की वाचा - Crime News :आंतरधर्मीय विवाह अन् आई-वडिलांचे तुकडे; भावनांचा तीव्र आक्रोश, अशी घटना जी वाचून अंगाचा थरकाप उडेल

सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा...

सहाय्यक व्यवस्थापकाजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय, लोकांनी त्याचा विश्वासाचा, साधेपणाचा फायदा घेतला. प्रत्येक निर्णयासाठी त्याने स्वत:ला जबाबदार धरलं. सोबतच भावुक शब्दात आई, बाबांची माफी मागितली. याशिवाय घराच कर्ज घेणं ही मोठी चूक असल्याचं त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. कुटुंबाची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार, अब्बासने गृहकर्ज घेतलं होतं. ज्यामुळे त्याच्या पगारातील ७५ टक्के भाग EMI मध्ये जात होता. त्याशिवाय त्याच्याकडे पगारातील केवळ २५ टक्के भाग राहत होता. यामुळे ते खूप टेन्शनमध्ये होते. १२ दिवसात लग्न होणार होतं. त्यामुळे पुढे कसं जमेल याची त्यांना टेन्शन होतं. यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्याने पुढे लिहिलंय, आम्ही सर्वांचा साधेपणा, भोळेपणा आणि विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला आहे... व्यवस्थापक स्वत:ला बँकेत काम करीत होता. यातून त्याने अशा प्रकारचं विधान लिहिलं असावं असा अंदाज आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com