आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artifical Intelligence) इंजिनिअर अतुल सुभाषच्या (Atul Subhash ) मृत्यूचा संपूर्ण देशाला धक्का बसलाय. सोशल मीडियासह सर्व प्लॅटफॉर्मवर त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेनंतर अधिवक्ता महेश कुमार तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत देशात 2021 साली झालेल्या आकास्मिक मृत्यूची आकडेवारी समोर आलीय. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नं ही आकडेवारी दिलीय. त्यामध्ये विवाहित महिलांच्या तुलनेत तिप्पट विवाहित पुरुषांनी या हिंसाचाराला कंटाळून जीव दिलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
NCRB नं दिलेल्या आकडेवारीनुसार 2021 साली 1,64,033 जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये 81,063 विवाहित पुरुषांचा समावेश होता. तर 26,680 विवाहित महिलांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांची संख्या महिलांपेक्षा तिप्पट आहे.
अतुल सुभाषचं प्रकरण काय?
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये DGM म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी 40 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये पत्नी आणि सासरच्या मंडळींवर छळवणूक केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात तडजोड करण्यासाठी पत्नीनं 3 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा दावाही अतुलनं केलाय. त्याचबरोबर मुलाची देखभाल आणि मेनटेनेंससाठी वेगळी रक्कम मागितली होती.
( नक्की वाचा : Sunil Pal : बनावट कार्यक्रम, खंडणी आणि... कॉमेडियन सुनील पालनं सांगितली अपहरणाची संपूर्ण स्टोरी )
अतुलचे भाऊ विकास सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार अतुलचं लग्न 2019 मध्ये झालं होतं. त्याला पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी अनेक खोट्या तसंच गंभीर आरोपांमध्ये अडकवलं होतं. त्यामुळे अतुल खूर त्रस्त होता. त्यानं डिप्रेशनमध्ये स्वत:चा जीव दिला. अतुलच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
- अतुल सुभाषचं लग्न 2019 साली झालं होतं. त्याला 2 वर्षांचा मुलगा आहे.
- पत्नी आणि सासरच्या मंडळींवर केला आरोप
- त्यानं आत्महत्येपूर्वी दीड तासांचा व्हिडिओ तयार केला. तसंच 40 पानांची नोट्स लिहिली.
- पत्नीवर 3 कोटी निर्वाह भत्ता मागितल्याचा आरोप
- पत्नीवर मुलाचा चेहरा बघू देत नसल्याचा आरोप
पोलिसांनी काय सांगितलं?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'सुभाषच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आम्ही त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींवर आत्महत्येला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. सर्व आरोपांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात प्राथमिक तपासानुसार सुभाष आणि त्याच्या पत्नीमध्ये वैवाहिक तणाव होता. त्याच्या पत्नीनं सुभाषच्या विरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल केली होती. या अधिकाऱ्यांनी सांगितलं, सुभाषनं त्याची सुसाईड नोट अनेकांना ईमेल तसंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |