जाहिरात

Sunil Pal : बनावट कार्यक्रम, खंडणी आणि... कॉमेडियन सुनील पालनं सांगितली अपहरणाची संपूर्ण स्टोरी

Sunil Pal : बनावट कार्यक्रम, खंडणी आणि... कॉमेडियन सुनील पालनं सांगितली अपहरणाची संपूर्ण स्टोरी
Comedian Sunil Pal kidnapping case : सुनील पालला अपहरण करुन मेरठमध्ये ओलीस ठेवण्यात आलं होतं.
मुंबई:

Comedian Sunil Pal kidnapping case : लोकप्रिय कॉमेडिन सुनील पाल सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील पालचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडं खंडणी देखील मागण्यात आली. गुन्हेगारांनी अपहरणाचा संपूर्ण कट कसा रचला याची माहिती स्वत: सुनील पालनं NDTV सोबत बोलताना दिली आहे. 

सुनील पाल यांचं एका कार्यक्रमाच्या नावाखाली दोन डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं. किडनॅपर्सनी त्यांना 24 तास मेरठमध्ये ओलीस ठेवलं होतं. त्यानंतर ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून आठ लाख रुपये वसूल केल्यानंतरच पालची मुक्कता होऊ शकली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किडनॅपर्सनी काय केलं?

सुनील पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डोळ्याला पट्टी बांधून एका घरामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर किडनॅपर्सनी खंडणीच्या रकमेेतून दागिने खरेदी केले. किडनॅपर्लना मेरठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आकाश गंगा ज्वेलर्समधून चार लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यानंतर लालकूर्तीच्या एका सराफाच्या दुकानातून 2.25 लाख रुपयांची खरेदी केले. 

या दोन्ही ठिकाणी सुनील पाच्या नावानं दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी सुनील पालचे आधार आणि पॅनकार्ड देण्यात आले. सुनील पालच्या मोबाईलमधूनच ऑनलाईन रक्कम ज्वेलर्सच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. या प्रकरणात सराफा व्यापाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रारकेली आहे. त्याचबरोबर मेरठमधील पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. 

Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार'

( नक्की वाचा :  Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार' )

कसं झालं अपहरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉमेडियन सुनील पालला दोन डिसेंबर रोजी रात्रीच्या कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी हरिद्वारला बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी तो मुंबईहून दिल्लीला विमानानं आला. पाच-सहा आरोपींनी दिल्लीमधूनच त्यांचं अपहरण केलं. किडनॅपर्सनी त्यांना कारमध्ये बसवून मेरठला नेलं. या काळात त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे त्याला काहीही पाहता आलं नाही.

सुनील पालला मेरठमधील रस्त्यावर सोडून आरोपी फरार झाले. ज्वेलर्स अक्षित सिंघलचे खाते फ्रिज करण्यात आले आहे. तसंच सुनील पालनं या प्रकरणात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर पोलीस दोन आणि तीन डिसेंबरच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com