35 सेकंदात खेळ खल्लास, वनराज निवांत उभा होता अन्...; पुण्यातील गँगवॉरचा Live Video

धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना काही नागरिक दुचाकीने त्याच भागातून जात होते.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

गँगस्टर शरद मोहोळ याच्या खुनानंतर पुण्यातील ही दुसरी हत्येची घटना समोर आली आहे.  राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. (Vanraj Andekar Live Video)

वनराज रविवारी मध्यरात्री रस्त्यावर निवांत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी दहा ते पंधरा जणांच्या टोळीने त्याच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती तर बाकीच्यांनी शर्टामध्ये कोयते लपवून आणले होते. या पाचही आरोपींनी अचानक गोळीबार सुरू केला.

नक्की वाचा - Vanraj Andekar : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे पुन्हा हादरलं, खुनाचं धक्कादायक कारण

सुरुवातील हल्लेखोरांपैकी एकाने वनराज याच्यावर समोरून पॉइंट ब्लँकवरुन गोळी झाडली. मात्र ती चूकली. यानंतर वनराज पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्यावर मागून गोळ्या झाडण्यात आल्या. व्हिडिओमध्ये वनराज कंपाऊंडच्या आत गेल्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आल्याची शक्यता आहे. यावेळी काही हल्लेखोर कोयता घेऊन आले होते. वनराज याच्यावर कोयत्यानेही हल्ला केल्याची माहिती आहे.  यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना काही नागरिक दुचाकीने त्याच भागातून जात होते. सुदैवाने यात नागरिकांना दुखापत झाली नाही. 

काय आहे हत्येचं कारण?
प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर याच्या टोळीचं नाना पेठ परिसरात वर्चस्व आहे. तो गँगस्टर बंडू आंदेकर यांचा मुलगा आहे. News18 हिंदीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, घरगुती वादातून घडलेल्या या खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार आहे. काही वर्षांपूर्वी गणेश कोमकर यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावरही ॲसिड हल्ला केला होता.

Advertisement