पुण्यात रविवारी रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. रविवारी रात्री पुण्यातील नाना पेठ परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. आंदेकरावर आधी सुऱ्याने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर आरोपींनी पाच गोळ्या हवेत झाडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ते दहा आरोपींनी एकत्रितपणे वनराज याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा जागीच मृत्यू झाला. पुणे पोलीस आणि पुणे क्राइम ब्रान्च या प्रकरणाचा तपास करीत आहे.
पोलिसांनी सांगितलं की, दोन टोळ्यांमधील अंतर्गत कलहातून ही हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढण्यापूर्वी कथितपणे पाच ते सहा गोळ्या हवेत झाडल्या. सध्या हल्लेखोर फरार आहेत. हत्येच्या या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबाराच्या काही वेळापूर्वी या भागातील वीज गेली होती.
काय आहे हत्येचं कारण?
प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक वैमनस्य आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर याच्या टोळीचं नाना पेठ परिसरात वर्चस्व आहे. तो गँगस्टर बंडू आंदेकर यांचा मुलगा आहे. ही हत्या घरगुती वादातून घडली असून खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार असल्याची माहिती आहे. याशिवाय वनराज आंदेकर याच्या दोन्ही बहीण आणि त्यांचे पत्नी या खुनात सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नक्की वाचा - ' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
पुण्यात गँगवॉर फोफावतंय..
या भागातील गँगस्टर सूरज थोम्ब्रे हे या हत्येमागे असल्याचा संशय आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यातील वाढत्या गँगवॉरमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गँगस्टर शरद मोहाळ याचीही कोथरूडमध्ये दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील नाना पेठेत झालेल्या हिंसक चकमकीत आंदेकर टोळीच्या सदस्यांनी सूरज ठोंबरे टोळीतील दोघांवर हल्ला केला होता, त्यात दोन जणं ठार झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world